
Arattai app News : चेन्नईच्या 'झोहो कॉर्पोरेशन'ने विकसित केलेले 'अरट्टाई' (Arattai) हे 'मेड इन इंडिया' मेसेजिंग ॲप सध्या प्रचंड चर्चेत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'स्वदेशी ॲप' वापरण्याचे आवाहन केल्यानंतर, या ॲपने ॲपलच्या ॲप स्टोअरवर थेट पहिल्या क्रमांकावर (Top Spot) झेप घेतली आहे. यामुळे व्हॉट्सॲपला मोठी टक्कर मिळत आहे. गेल्या 3 दिवसांत या प्लॅटफॉर्मच्या ट्रॅफिकमध्ये तब्बल 100 पटीने वाढ झाली असून, हे ॲप व्हॉट्सॲपप्रमाणेच सर्व सुविधा देते.
We're officially #1 in Social Networking on the App Store!
— Arattai (@Arattai) September 27, 2025
Big thanks to every single Arattai user for making this possible. 💛#StayConnected #Arattai pic.twitter.com/gqxPW108Nq
'व्हॉट्सॲप'ने (WhatsApp) आपल्या गोपनीयता धोरणांमध्ये (Privacy Policy) बदल जाहीर केल्यानंतर, जानेवारी 2021 मध्ये 'झोहो'ने हे ॲप लाँच केले होते. मात्र, गेल्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी या ॲपला पाठिंबा देत ते वापरण्याचे आवाहन केले.
मंत्री प्रधान यांनी 'एक्स' (X) (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, "झोहोने विकसित केलेले 'अरट्टाई' इन्स्टंट मेसेजिंग ॲप फ्री (Free), वापरण्यास सोपे (Easy-to-use), सुरक्षित (Secure, Safe) आणि 'मेड इन इंडिया' आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 'स्वदेशी' स्वीकारण्याच्या आवाहनानुसार, मी सर्वांना मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले राहण्यासाठी भारत-निर्मित ॲप्स वापरण्याची विनंती करतो."
Arattai instant messaging app developed by @Zoho is free, easy-to-use, secure, safe and ‘Made in India'.
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) September 24, 2025
Guided by Hon'ble PM Shri @narendramodi ji's call to adopt Swadeshi, I appeal to everyone to switch to India-made apps for staying connected with friends and family.… pic.twitter.com/Tptgbzgivg
काय आहे 'अरट्टाई'?
- 'अरट्टाई' या तमिळ शब्दाचा अर्थ 'साध्या गप्पाटप्पा' (casual chat) असा आहे. 'व्हॉट्सॲप' प्रमाणेच 'अरट्टाई' वापरकर्त्यांना खालील सुविधा पुरवते
- टेक्स्ट आणि व्हॉइस मेसेजेस पाठवणे.
- व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स. (कॉलसाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन (End-to-end Encryption) उपलब्ध).
- फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करणे.
- स्टोरीज (Stories), ग्रुप्स (Groups) आणि चॅनल्स (Channels) तयार करणे.
- स्मार्टफोन, टॅबलेट आणि डेस्कटॉपसह मल्टि-डिव्हाइस सपोर्ट (Multi-device Support). (एकावेळी जास्तीत जास्त 5 डिव्हाइसेसवर वापरण्याची सोय).
- याशिवाय, वापरकर्ते इतर चॅट प्लॅटफॉर्मवरील संभाषणे (Conversations) देखील 'अरट्टाई'वर इम्पोर्ट (Import) करू शकतात.
सुरक्षेचा मुद्दा
'अरट्टाई'मध्ये कॉलसाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुविधा असली तरी, मेसेजेसना (Messages) अजूनही पूर्ण सुरक्षा (एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन) मिळालेली नाही. मेसेजेससाठी ही सुविधा लवकरच लागू कंपनीची योजना आहे.
वाढलेला उत्साह आणि पायाभूत सुविधांवर ताण
या वाढत्या लोकप्रियतेमुळे 'अरट्टाई'च्या वापरात मोठी वाढ झाली आहे. झोहोचे सह-संस्थापक श्रीधर वेम्बू (Sridhar Vembu) यांनी सोमवारी सांगितले की, फक्त 3 दिवसांत प्लॅटफॉर्मच्या ट्रॅफिकमध्ये 100 पटीने वाढ झाली आहे. दररोज नवीन साइन-अप्सची संख्या 3,000 वरून 3,50,000 वर पोहोचली आहे.
( नक्की वाचा : India Post: स्पीड पोस्ट महागले, 1 ऑक्टोबरपासून नवे दर! OTP शिवाय डिलिव्हरी नाही, लगेच तपासा किती लागतील पैसे )
वेम्बू यांनी 'एक्स'वर लिहिले की, "आणखी 100 पटीने वाढ झाल्यास ती हाताळण्यासाठी आम्ही तातडीने पायाभूत सुविधा (Infrastructure) वाढवत आहोत." येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी कोडमध्ये सुधारणा आणि अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. कंपनीने नोव्हेंबर महिन्यात अधिक क्षमता आणि नवीन वैशिष्ट्यांसह (New features) मोठे अपडेट आणण्याची योजना आखली आहे.
We have faced a 100x increase in Arattai traffic in 3 days (new sign-ups went vertical from 3K/day to 350K/day). We are adding infrastructure on an emergency basis for another potential 100x peak surge. That is how exponentials work.
— Sridhar Vembu (@svembu) September 28, 2025
As we add a lot more infrastructure, we are…
कोण आहेत संस्थापक?
'अरट्टाई'ची निर्मिती 1996 मध्ये श्रीधर वेम्बू आणि टॉनी थॉमस यांनी स्थापन केलेल्या 'झोहो कॉर्पोरेशन'ने केली आहे. चेन्नईमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ईमेल, सीआरएम (CRM), एचआर, अकाउंटिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसह 55 हून अधिक व्यावसायिक ॲप्लिकेशन्स (Business Applications) आहेत. आज, झोहो 150 देशांमधील 130 मिलियन हून अधिक वापरकर्त्यांना सेवा पुरवते. त्यांच्या जागतिक क्लायंट्समध्ये ॲमेझॉन (Amazon), नेटफ्लिक्स (Netflix), डेलॉईट (Deloitte), टोयोटा (Toyota), सोनी (Sony), प्यूमा (Puma) आणि लॉरियल (L'Oreal) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
'अरट्टाई' ॲन्ड्रॉइडच्या (Google Play Store) आणि आयओएसच्या (Apple App Store) दोन्ही ॲप स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world