Arun Gawli: अरुण गवळीची मोठी घोषणा, म्हणाला मी मुंबई महापालिकेची निवडणूक...

अरूण गवळी हा स्वत:आमदार राहीला आहे. त्याने लोकसभेची निवडणूक ही लढवली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी सध्या जामीनावर बाहेर आहे. दगडी चाळ आणि नवरात्र हे एक समिकरण आहे. इतक्या वर्षानंतर अरूण गवळी हा दगडी चाळीच्या नवरात्रात सहभागी झाला आहे. त्याने आज देवीचं दर्शन घेतलं. शिवाय आपण आज ते काही आहोत ते देवी मुळे आहोत. देवीची कृपा आपल्यावर आहे. त्यामुळेच मी इतके वर्ष जिवंत आहे. या पुढे ही देवीची कृपा आपल्यावर राहील अशी भावना त्याने व्यक्त केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना अरूण गवळी याने आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबतही भाष्य केलं आहे. त्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. 

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. त्यात आता अरूण गवळी जामीनावर बाहेर आला आहे. अरूण गवळीचा अखिल भारतीय सेना हा पक्ष ही आहे. सध्या पक्षाचं काम सक्रीय पणे होत नाही. पण गवळी बाहेर आल्यामुळे या पक्षाला उभारी मिळेल अशी चर्चा आहे. काही काळ हा पक्षा त्याच्या मुलीने सांभाळला होता. त्या पक्षाच्या नगरसेवकही झाल्या होत्या. आता गवळी बाहेर आल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक अखिल भारतीय सेना लढवणार का याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत थेट अरूण गवळी यालाच विचारण्यात आलं. 

नक्की वाचा - Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा हैदोस! खात्री पटल्याशिवाय लोक उघडत नाहीत दार

अरूण गवळी हा स्वत:आमदार राहीला आहे. त्याने लोकसभेची निवडणूक ही लढवली होती. त्यात त्याला चांगली मतं ही मिळाली होती. त्याचा मानणारा भायखळा भागात मोठा वर्ग आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेची निवडणूक डॅडी लढणार का असं विचारण्याच आलं. त्यावर बोलताना अरूण गवळी म्हणाला, मला सर्व जण आपला मानतात. लोक प्रेम करतात. पण आता लिडर शिप करण्याची आपली इच्छा नाही. मला राजकारणात कोणताही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मी आणि माझा पक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार नाही असं त्याने स्पष्ट केलं आहे. 

नक्की वाचा - Navratri 2025: नवरात्रात घरात 'या' गोष्टी आणल्याने वाढते सुख-समृद्धी, मिळतो देवी भगवतीचा आशीर्वाद

त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अरूण गवळी मैदानात असणार नाही. पण पडद्या मागून तो कोणाला मदत करतो याकडे सर्वांचे लक्ष नक्कीच असणार आहे. त्याला कारण ही तसेच आहे. भायखळा भागात अरूण गवळीचे मोठे नेटवर्क आहे. तो याच भागात राहातो. शिवाय त्याने या भागातून निवडणूक लढवत एकदा आमदारकी ही मिळवली आहे. त्याच बरोबर त्याची मुलगी याच भागातून नगरसेवकही राहीली आहे. अशा स्थितीत गवळीची ताकद आपल्या बाजूने राहावी यासाठी राजकीय पक्ष निश्चितच प्रयत्न करणार अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे.  

Advertisement