- आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले
- ९२ वर्षांच्या आशा भोसले यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू
- आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय बुलेटिन अद्याप प्रसिद्ध झाले नाही
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. अशी माहिती डॉक्टरांनी माहिती दिली आहे. त्यांच्यावर दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या 92 वर्षीच्या होत्या. त्यांच्यावर उद्या चार वाजता शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आशाताईंना हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागल्याने शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आयसीयुमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांना आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर झालेली नव्हती. शेवटच्या क्षणांपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल त्यांची नात जनाई हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. "आजीला अशक्तपणा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत," असे जनाईने म्हटले आहे. मात्र आज त्यांचे निधन झाले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले पुन्हा बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली होती. आशा भोसलेंना रुग्णालयात दाखल केल्याचे ऐकून वेदना झाल्या. त्या लवकर बऱ्या होवोत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो यासाठी प्रार्थना करतो असं पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटलं होतं. आशा ताईंच्या चाहत्यांनी ही त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली होती. आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत रविवारी सकाळपासून संगीत क्षेत्रात चिंतेचे सावट होतं.
आशा भोसले यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 12,000 हून अधिक गाणी गायली आहेत. दिवंगत गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या भगिनी आहेत. 2023 मध्ये त्यांनी दुबईत वयाच्या 90 व्या वर्षी लाइव्ह कॉन्सर्ट करून चाहत्यांना थक्क केले होते. त्यांच्या निधड्या छातीच्या आणि सुमधुर आवाजाच्या चाहत्यांनी त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. आशा भोसले यांचा फार मोठा चाहता वर्ग जगभरात पसरला आहे.