जाहिरात

Jalgaon News: eKYC चा बहाणा, लाडक्या बहीणीकडे नको ती मागणी, कांड ऐकून तळ पायाची आग मस्तकात जाईल

नोव्हेंबर- डिसेंबर 2025 या महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याने ही महिलेला केवायसी करण्याचा सल्ला हा देण्यात आला होता.

Jalgaon News: eKYC चा बहाणा, लाडक्या बहीणीकडे नको ती मागणी, कांड ऐकून तळ पायाची आग मस्तकात जाईल
जळगाव:

मंगेश जोशी 

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने जळगावमध्ये  महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयीत गोकुळ चव्हाण याच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर डिसेंबर 2025 या महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याने सदर महिलेला केवायसी करण्याचा सल्ला हा देण्यात आला होता.

याबाबत गोकुळ चव्हाण या व्यक्तीला माहिती मिळताच त्याने महिलेच्या घरी जाऊन केवायसी करून देतो असं सांगितलं.  मात्र त्या बदल्यात त्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा फिर्यादीत पीडित महिलेचा आरोप आहे. महिलेने सदर प्रकार आपल्या पतीला सांगितला व महिलेच्या पतीनेही गोकुळ चव्हाण याला पुन्हा आपल्या परिसरात न येण्याची तंबी दिली. मात्र तरी ही गोकुळ चव्हाण हा महिलेचा सतत पाठलाग करत असल्याचेही तक्रारी म्हटले आहे.

नक्की वाचा - Pune News: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण, Video होतोय Viral

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित गोकुळ चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर- डिसेंबर 2025 या महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याने ही महिलेला केवायसी करण्याचा सल्ला हा देण्यात आला होता. 

नक्की वाचा - Vande Bharat: मुंबई-बेंगळुरू दरम्यान आता स्लीपर 'वंदे भारत'! रेल्वेमंत्र्यांची मंजुरी, पुणेकरांना ही फायदा

गोकुळ चव्हाण या आरोपीला याची माहिती मिळाली. त्यांने त्यानंतर थेट या महिलेचे घर गाठले. गोड बोलून तिला आपण तुला केवायसी करून देतो असं ही सांगितलं. मात्र त्या बदल्यात त्यांने नको त्या गोष्टीचा मागणी त्या महिलेकडे केली. शरीर सुखाची मागणी केल्याने ती महिला हादरली. त्यामुळे तिने तातडीने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर पतीने गोकुळ चव्हाण या गाठून दम दिला. शिवाय घराच्या आजूबाजूला फिरकू नको अशी तंबी दिली. त्यानंतर ही आरोपी या महिलेचा पाठलाग करतच होता. तिच्यावर पाळत ठेवत होता. याप्रकरणी शहर पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com