Ashadhi Wari 2026: 10 जुलैपासून पंढरपुरात मोठा बदल, विठुरायाच्या दर्शनाबाबत 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय लागू

Ashadhi Wari 2026: आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Pandharpur Ashadi Wari 2026: पंढरपुरातील विठ्ठल मंदिर दर्शनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय"
Vitthal Rukmini Mandir Official Instagram

Pandharpur News: आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा विठ्ठल दर्शनाचा प्रवास अधिक सुलभ आणि सुकर होणार आहे. यंदा आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 10 जुलै 2026 पासून विठ्ठल-रुक्मिणीचे 'व्हीआयपी' (VIP) दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी मंदिर परिसर 'नो-व्हेईकल झोन' करण्यात येणार आहे. राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली.

सामान्य वारकऱ्यांचे दर्शन होणार सुलभ

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात संपूर्ण महाराष्ट्रातून आणि शेजारील राज्यांतून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात. अनेकदा व्हीआयपी दर्शनामुळे दर्शनाची रांग थांबवली जाते, ज्यामुळे तास-न्-तास रांगेत उभे राहणाऱ्या सामान्य वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हाच त्रास कमी करण्यासाठी आणि कमीत कमी वेळेत भाविकांना विठुरायाचे दर्शन घडावे, यासाठी 10 जुलैपासून व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे थांबवली जाणार आहे. आता सर्वांना एकाच रांगेतून माऊलीचे दर्शन घ्यावे लागेल.

Advertisement

मंदिर परिसरात गाड्यांना बंदी ('नो-व्हेईकल झोन')

आषाढी वारीदरम्यान पंढरपूर शहरात, विशेषतः मंदिर परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंदिर परिसर 'नो-व्हेईकल झोन' (वाहनांना बंदी असलेला परिसर) घोषित करण्यात आला आहे. यामुळे भाविकांना कोणत्याही वाहनांच्या अडथळ्याशिवाय आणि अपघाताच्या भीतीशिवाय मंदिर परिसरात फिरता येईल.