Ayush komkar murder case: बंडू आंदेकरच्या घरावर छापा, पुणे पोलिसांना घरात काय काय सापडलं?

आयुष कोमकर खून प्रकरणात आता तपासाला वेग आला आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि या खूनातला मुख्य आरोपी बंडू आंदेकर याच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी 

गणेश विसर्जनाच्या पुर्वसंध्येला पुण्यात गँगवॉरने डोकं वर काढलं होतं. आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील अन्य आरोपींना अटक केली. आता या खूनाच्या तपासाला वेग आला आहे. पुणे पोलिस सर्व शक्यता पडताळून पाहात आहेत. कोणताही पुरावा मागे सुटू नये यासाठी काळजी घेत आहेत. त्यामुळेच भल्या पहाटे पुणे पोलिसांना मुख्य आरोपी बंडू आंदेकर यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी बंडू आंदेकरला ही पोलिस त्याच्या घरी घेवून आले होते. त्यावेळी त्याच्या घरातून ज्या गोष्टी सापडल्या त्या पाहाता तुम्ही ही चक्रावून जाल. 

आयुष कोमकर खून प्रकरणात आता तपासाला वेग आला आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि या खूनातला मुख्य आरोपी बंडू आंदेकर याच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला. हा छापा गुरूवारी पाहाटे टाकण्यात आला. यावेळी आंदेकरच्या घरातून तब्बल 77 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. शिवाय चांदीचे दागिनेही ताब्यात घेण्यात आले. त्याच बरोबर अडीच लाखांची रोकड, मोटार, करारनामे, कर पावत्या असा जवळपास कोट्यवधींचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आंदेकर पैशाच्या जीवावर आपली टोळी चालवत होता ते या छाप्यातून पुन्हा एकदा समोर आलं आहे.

 Pune News: 'सासऱ्याशी शरीर संबंध ठेव', पती अन् सासूचा सुनेवर दबाव, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात भयंकर कांड

या शिवाय आंदेकरने केलेल्या जमीन व्यवहाराच्या इसार पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत. यातून ही त्याला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत होते. आंदेकर याच्या घरावर छापा टाकला. त्या वेळी पोलिसांनी आंदेकरला त्याच्या नाना पेठेतील घरी नेले होते. गुरुवारी पहाटेपर्यंत आंदेकरच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू होते. आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर, तिची मुले स्वराजे आणि तुषार यांच्या घराची ही पोलिसांनी झडती घेतली आहे. त्यांच्या घरातही पोलिसांना अनेक गोष्टी सापडल्या आहेत. 

नक्की वाचा - Pune News: आयुष कोमकरच्या हत्ये आधी काय घडलं? थरारक घटनाक्रम सांगताना आई ढसाढसा रडली

वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून 21 हजारांची रोख रक्कम मिळाली आहे. शिवाय 16 मोबाइल संच मिळाले आहेत. त्याच बरोबर दागिन्यांच्या पावत्या, एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. बंडू आंदेकरच्या घराजवळ 25 हून जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचं ही पोलिसांना आढळून आलं आहे. आंदेकरने वैयक्तिक सुरक्षेसाठी घराच्या परिसरात 25 हून जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. दरम्यान त्याचे कुलमुख्यारपत्र, बँक पुस्तिका, विविध करारनामे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बंडू आंदेकरसाठी मोठा दणका मानला जात आहे. त्याच्या संपत्तीवरच पोलिसांना टाच आणली आहे.  

Advertisement