अद्याप मुसळधार पाऊस नाही तोच बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू, टेन्शन वाढलं!

मात्र अद्याप मुसळधार पावसाला सुरुवातही झालेली नाही, तोच दुर्घटना घडल्यामुळे कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बदलापूर:

बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनुप मिश्रा असं या तरुणाचं नाव असून तो नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथून चार मित्रांसह कोंडेश्वरला फिरण्यासाठी आला होता.

कोंडेश्वरच्या महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन निघताना त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि हे तरुण पाण्यात उतरले. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनुप याचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. अनुप हा अतिशय गरीब कुटुंबातील असून तरुण मुलगा गमावल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

दरम्यान, कोंडेश्वर धबधब्यात पोहण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही पर्यटक पाण्यात पोहोण्यासाठी जातात. येथे आतापर्यंत अनेक तरूणांनी आपला जीव गमावला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोंडेश्वरला जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात येते. मात्र अद्याप मुसळधार पावसाला सुरुवातही झालेली नाही, तोच दुर्घटना घडल्यामुळे कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Advertisement

नक्की वाचा - बाबा आमटेंचं आनंदवन हादरलं, बाथरूममध्ये 25 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?

बदलापूरापासून साधारण 6 ते 7 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर धबधबा आहे. येथे दर पावसाळ्यात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी येत असतात. मात्र येथील धबधब्याचा आनंद घेताना दरवर्षी अनेक पर्यटकांनी जीव गमावला आहे. काहींच्या मते पाण्यात भोवरा असल्याने जास्त पाऊस झाल्यानंतर याचा अंदाज येत नाही आणि पर्यटकांना जीव गमवावा लागतो. तर कोंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेले मंदिर आणि कुंड पाण्याखाली जातात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार दरवर्षी पर्यटकांना धबधब्यात जाण्यास मनाई करतात. यंदा पुरेसा पाऊस झाला नसतानाही येथे एका तरूणाचा मृत्यू झाल्याने पोलिसांचं टेन्शन वाढलं आहे.   

Advertisement