Badlapur News: ग्राहकाला बुरशीयुक्त पिझ्झा बेस विकला, मोठा ब्रँड अलगद FDA च्या जाळ्यात अडकला, परवाना रद्द

मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिलं. शिवाय आपली चूक अमान्य केली. त्यानंतर या प्रकरणात एन्ट्री झाली ती मनसेची.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बदलापुरातील फ्लिपकार्ट मिनिट्सचा एफडीएने परवाना निलंबित केला आहे
  • खाद्यपदार्थांमध्ये बुरशी आणि भेसळ आढळल्याने स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी तक्रार केली
  • तक्रार झाल्यानंतर एफडीए अधिकाऱ्यांनी फ्लिपकार्ट मिनिट्सवर छापा टाकून खराब खाद्यपदार्थांची तपासणी केली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बदलापूर:

अमजद खान 

सध्या खाद्य पदार्थातील भेसळ, खराब खाद्य पदार्थ विकणारे एफडीएच्या रडारवर आहेत. एफडीएमध्ये तुकाराम मुंडे यांची एन्ट्री झाल्यानंतर जनतेमध्ये ही जनजागृती झाली आहे. खराब झालेली खाद्य पदार्थ विकले जात असतील तर त्याच्या तक्रारी लोक एफडीएकडे केल्या जात आहेत. शिवाय एफडीएकडूनही तातडीने कारवाई केली जात आहे. त्याचाच प्रत्यय बदलापूरमध्ये आला आहे. एफडीएनं इथल्या एका नामांकीत अस्थापनेला दणका देत त्यांचा थेट परवानाच रद्द केला आहे. एका सजग नागरिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली. यात स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी ही पुढाकार घेतला होता.  

बदलापुरात FDAनं मोठी कारवाई केली आहे. ग्राहाला बुरशी लागलेला पिज्झा बेस विकण्यात आला होता.  या प्रकरणी राऊत चौकातील फ्लिपकार्ट मिनिट्सचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. ग्राहकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात मनसेनं आवाज उठवला होता. त्यानंतर FDA च्या अधिकाऱ्यांनी काल रविरारी संध्याकाळी फ्लिपकार्ट मिनिट्सच्या गोडावूनवर छापा टाकला. त्यानंतर सर्व खाद्यपदार्थांची तपासणी केली. काल संध्याकाळपासून सुरू झालेली ही कारवाई आज दुपारपर्यंत सुरू होती. या कारवाईदरम्यान याठिकाणी FDA अधिकाऱ्यांना काही खराब झालेले खाद्यपदार्थ आढळून आले आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari: वारीच्या वाटेवर टाळ अन् घुंगरूचा संगम! गेल्या 32 वर्षापासून लावणी अन् वारकऱ्याची अनोखी परंपरा

त्यानंतर या फ्लिपकार्ट मिनिट्स ब्रांचचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर कायमस्वरूपी कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सिद्धांत रोठे यांनी फ्लिपकार्ट मिनिट्स मधून दोन पीझ्झा बेस मागवले होते. त्यापैकी एक बेस निरखून पाहीला असता त्याला बुरशी लागल्याचं त्यांना आढळून आलं. त्यांनी तातडीने याबाबतची तक्रार फ्लिपकार्ट मिनिट्सकडे केली. मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिलं. शिवाय आपली चूक अमान्य केली. त्यानंतर या प्रकरणात एन्ट्री झाली ती मनसेची. 

नक्की वाचा - Ashadhi Wari: आळंदी ते पंढरपूर, माऊलींसाठी रांगोळीच्या पायघड्या! 15 वर्षापासून सेवा करणारी तरुणी

मनसे कार्यकर्ते फ्लिपकार्ट मिनिट्सच्या बाहेर जमा झाले. त्यांनी त्यांना याबाबत जाब विचारला. पण त्याचा काही असर फ्लिपकार्ट मिनिट्सवर झाला नाही. सर्वांनी थेट पोलीसात धडक दिली. तिथून एफडीएकडे तक्रार करण्यात आली. तक्रार झाल्यानंतर एफडीएचे अधिकारी अँक्शन मोडवर आले. त्यांनी या ठिकाणी धाड टाकली. या धाडीत त्यांना खराब झालेले खाद्यपदार्थ आढळून आले. त्यानंतर याचा परवानाच रद्द करण्यात आला. अशा पद्धतीचे खराब झालेले खाद्य पदार्थ ग्राहकांना विकणे म्हणजे त्यांची फसवणूक आहे. अशी दुकानं सील केली पाहीजेत अशी मागणी मनसे शहर प्रमुख निशांत मांडवीकर यांनी केली आहे.