Akshay Shinde Encounter : 'जैसे ज्याचे कर्म तैसे...' राज ठाकरेंच्या नेत्यांनं केलं ठाणे पोलिसांचं अभिनंदन

Akshay Shinde Encounter : विरोधी पक्षातून टीका होत असतानाच ठाणे पोलिसांचं अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढं सरसावली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Akshay Shinde Encounter : बदलापूरमधील शाळेतील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काऊन्टर केलं आहे. ळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अक्षयच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केलीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केलीय. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी 'आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे' असा आरोप ट्विट करत केला होता.

विरोधी पक्षातून टीका होत असतानाच ठाणे पोलिसांचं अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढं सरसावली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी या एन्काऊन्टरनंतर पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. राजू पाटील हे ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत. त्यांचा मतदारसंघ ही घटना घडली त्या बदलापूरच्या जवळच आहे.

( नक्की वाचा : Akshay Shinde Encounter : 'अक्षयला एन्काऊन्टरपूर्वीच तुरुंगात चिठ्ठी आली होती', आईची पहिली प्रतिक्रिया )
 

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ! या अभंगाचा दाखला देत राजू पाटील म्हणतात, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी गोळ्या झाडून एन्काऊंटर केला. कोणी कितीही काहीही बोललं तरी आमच्या सर्वांच्या मनात हेच आहे, त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला अखेर मिळालीच आणि आमच्या चिमुकल्यांना न्याय मिळाला.ठाणे पोलिसांचे मनापासून अभिनंदन ! असं म्हणत राजू पाटील यांनी ठाणे पोलिसांना टॅग करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर !

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी गोळ्या झाडून एन्काऊंटर केला. कोणी कितीही काहीही बोललं तरी आमच्या सर्वांच्या मनात हेच आहे, त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला अखेर मिळालीच आणि आमच्या चिमुकल्यांना न्याय मिळाला.ठाणे…

— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 23, 2024

बदलापुरात जल्लोष

बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण शहर हादरलं होतं. बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक रस्त्यावर झाला. बदलापूर बंद करुन, तसंच लोकल अडवून त्यांनी या प्रकरणाचा निषेध केला होता. अक्षय शिंदेच्या एन्काऊन्टरनंतर बदलापूरमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. बदलापूरकरांनी फटाके फोडत तसंच एकमेकांना पेढे भरवत या एन्काऊन्टरचा आनंद व्यक्त केला.