Bank Strike: गुरुवारी बँका सुरु की बंद? 12 फेब्रुवारीच्या संपाबाबत मोठे कन्फ्युजन, जाणून घ्या काय आहे सत्य

Nationwide Bank Strike on February 12, 2026: उद्या म्हणजेच  12 फेब्रुवारी 2026 रोजी  तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Bank Strike News : देशातील मोठ्या बँक युनियन्सनी एक दिवसाच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.
मुंबई:

Nationwide Bank Strike on February 12, 2026: उद्या म्हणजेच  12 फेब्रुवारी 2026 रोजी  तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील मोठ्या बँक युनियन्सनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी एक दिवसाच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीतमोठा प्रश्न हा आहे की उद्या बँका नक्की बंद राहणार का? हा  ग्राहकांच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न आहे.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार उद्या कोणतीही अधिकृत सरकारी सुट्टी नाही, मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) या संघटनांनी आपल्या सदस्यांना 12 फेब्रुवारीच्या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या संघटना 10 केंद्रीय कामगार संघटनांसोबत मिळून या संपात उतरत आहेत. 

Advertisement

सरकारचे नवीन लेबर कोड कर्मचाऱ्यांच्या हिताचे नाही, असा या संघटनांचा आरोप आहे. याशिवाय बँक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठवड्यातून पाच दिवस काम (5-Day Work Week) आणि कामाच्या ठिकाणी योग्य ताळमेळ राखला जावा, अशी मागणी करत आहेत. या विरोधामुळे बँकांना अधिकृत सुट्टी नसली तरी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ग्राहकांचे काम रखडू शकते.

( नक्की वाचा : NEET-PG Cut-Offs:उणे 12 मार्क्स असूनही मेडिकलला सीट! केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे गुणवत्तेचे वाजले बारा )

SBI आणि इतर मोठ्या बँकांवर काय परिणाम होणार?

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पष्ट केले आहे की 12 फेब्रुवारी रोजी देशभरातील बँक संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, संपाच्या काळात कामकाजात अडथळे येण्याची शक्यता आहे. आयडीबीआय बँकेलाही युनियन्सकडून संपाची नोटीस मिळाली आहे. 

एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या मोठ्या सरकारी बँकांनी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कामकाज सामान्य ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, तरीही सेवा मिळण्यास विलंब होऊ शकतो. तुम्हाला चेक जमा करायचा असेल, रोख रक्कम काढायची असेल किंवा कर्जाशी संबंधित काम असेल, तर  उद्या चेक क्लीयरन्सचा वेग कमी राहू शकतो. बँक काउंटरवर लांबच लांब रांगा पाहायला मिळू शकतात.

( नक्की वाचा : AI VIDEO पोस्ट करताय? सावधान! मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता थेट होणार कारवाई, वाचा सर्व नियम )
 

ऑनलाइन सेवा आणि एटीएमबाबत दिलासा

ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे नेट बँकिंग, मोबाईल ॲप आणि युपीआय सारख्या ऑनलाइन सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. एटीएममध्ये रोख रकमेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. 

Advertisement

मात्र, जर तुम्हाला प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाणे अनिवार्य असेल, तर तुमच्या जवळच्या शाखेशी एकदा संपर्क साधून खात्री करून घ्या. संपाचा परिणाम वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि शाखांमध्ये कमी-जास्त प्रमाणात असू शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी आपले नियोजन वेळेत पूर्ण करणे फायद्याचे ठरेल.