सुनेत्रा पवारांचे बारामतीत लागले भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर

तटकरे आणि पटेल यांच्यात मंत्रीपदावरून वाद झाल्याची चर्चा होती. ही चर्चा सुरू असतानाच आता बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरमुळे वादात आणखी भर पडणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बारामती:

केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्थान मिळाले नाही. अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र ती ऑफर अजित पवारांनी फेटाळली. मंत्रिमंडळात प्रफुल पटेल यांचा समावेश केला जावा अशी भूमीका अजित पवार यांची होती. या आधी पटेल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. अशा वेळी त्यांना राज्यमंत्री करणे योग्य नव्हते असे अजित पवारांनी स्पष्ट केले होते. यावेळी तटकरे आणि पटेल यांच्यात मंत्रीपदावरून वाद झाल्याची चर्चा होती. ही चर्चा सुरू असतानाच आता बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरमुळे वादात आणखी भर पडणार आहे. या बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा उल्लेख भावी केंद्रीय मंत्री म्हणून करण्यात आला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेत दणदणीत पराभव झाला. त्यानंतर अनपेक्षित पणे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. त्यामुळे जेष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले. त्यांची नाराजी लपवू शकली नाही. खासदार होण्यास आपण इच्छुक होतो असे त्यांनी बोलून दाखवले. पक्षात अशा घटना होत असतात. पुढे काय होते ते पाहात राहायचे असेही ते बोलले होते. त्यामुळे सुनेत्रा पवारांना दिल्ली पाठवण्याचा निर्णय काही भुजबळांच्या पचनी पडला नव्हता. त्यात आता सुनेत्रा पवार भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर थेट बारामतीत लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील मंत्री होवू पाहाणाऱ्या नेत्यांचे टेन्शन वाढले तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.   

Advertisement

ट्रेंडिग बातमी - विधानसभा निवडणुकी आधीच ठाकरेंना शिंदेंचा दणका, बडा नेता गळाला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाल्यानंतर बारामती शहरात भावी केंद्रीय मंत्री म्हणुन सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागले आहेत.सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा उल्लेख या बॅनर वर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीत काय काय घडामोडी होतात ते पहावं लागेल. 

Advertisement

Advertisement