महिलांनो, 'लाडक्या बहिणी'सह 3 सरकारी योजनांचा घ्या फायदा, घरबसल्या करा लाखोंची कमाई

Best Government Schemes for Women: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह 3 सरकारी योजनांचा महिलांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Best Government Schemes for Women: केंद्र आणि राज्य सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी  (Women Empowerment) आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर (Financially independent) करण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या सरकारी योजना (Government Scheme) वेगवेगळ्या पातळीवर महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करतात. आज आम्ही तुम्हाला 3 महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती देणार आहोत. या योजना महिलांना समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आल्या आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  (Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana)

महाराष्ट्र सरकारनं यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

लाडक्या बहीण योजनेच्या अटी

  • महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलाच या योजनेसाठी अर्ज करण्यास (Eligible) पात्र आहेत.
  • अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातील स्थायी निवासी असावी.
  • महिला अर्जदाराचे वय 21 ते 65 दरम्यान असावे
  • विवाहित, अविवाहित, परित्यक्त्या, घटस्फोटिता, आणि निराधार अशा सर्व प्रकारच्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत
  • अर्जदार महिलेच्या बँकेत खातं असणं आवश्यक आहे
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे

( नक्की वाचा : Lakhpati Didi Scheme : महिलांचं भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना काय आहे? कसा करणार अर्ज? )

लाडकी बहीण योजनेसाठी कुठे अर्ज करणार ?

- नारीशक्ती दूत अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करु शकता

- ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांनी अंगणवाडी सेवक/ पर्यवेक्षक/मुख्य सेवक/ सेतू सुविधा केंद्र/ग्राम सेवक/समूह संसधान व्यक्ती  (Group Resource Person - CRP)/आशा सेवक/वार्ड अधिकारी/सीएमएम (सिटी मिशन मॅनेजर)/एमएनपीए बालवाड़ी सेवक/ सहाय्यक कक्ष प्रमुख यांच्याशी संपर्क करु शकता

-  सरकारी सेवा केंद्रामध्ये या योजनेची ऑनलाईन तसंच ऑफलाईन रजिस्ट्रेशनची सोय उपलब्ध आहे.

-  या योजनेसाठी अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क नाही. 

महिला सम्मान बचत पत्र (Mahila Samman Savings Certificate)

महिला सम्मान बचत पत्र (Mahila Samman Savings Certificate) केंद्र सरकारनं महिलांसाठी सुरु केलेली अल्प बचत योजना आहे. ही योजना 2023 साली सुरु झाली. या योजनेत देशातील कोणतीही महिला गुंतवणूक करु शकते. ही योजना फक्त 2 वर्षांसाठी आहे. त्यामध्ये वार्षिक 7.5 टक्के व्याज दिले जाते. या योजनेमध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करु शकता. 

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )

योजनेसाठी पात्रता (Eligibility) आणि अटी

  • देशात राहणारी कोणतीही महिला या योजनेसाठी पात्र आहे.
  • एखादी अल्पवयीन मुलगी तिचे आई-वडिल किंवा कायदेशीर पालकांच्या माध्यमातून या योजनेसाठी खातं सुरु शकते.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)  मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेनुसार 8.2 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. इतकंच नाही तर इन्कम टॅक्समधील सेक्शन 80 C नुसार करामधील सवलतीचा फायदा देखील तुम्हाला मिळू शकतो. 

Advertisement

योजनेसाठी पात्रता (Eligibility) आणि अटी

  • या योजनेसाठी 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलीसाठी तिचे आई-वडिल किंवा कायदेशीर पालक खातं सुुरु शकतात.
  • एका मुलीच्या नावावर फक्त एकच खातं सुरु करता येईल
  • कोणत्याही मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालकांना जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच बँक खातं उघडण्याची परवानगी आहे.
  • खातेधारक प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये किमान 250 आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करु शकतात.
  • एखाद्या आर्थिक वर्षात  (Financial Year) किमान 250 रुपये खात्यामध्ये जमा झाले नाहीत तर खातेधारकांना 50 रुपये दंड लावण्यात येईल.
  • या योजनेसाठी खातं उघडलेल्या तारखेपासून 14 वर्ष पैसे डिपॉझिट करु शकता. पण मॅच्युरिटीसाठी मुलगी 21 वर्षांची होणे आवश्यक आहे.