जाहिरात

Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : केंद्र सरकारच्या विविध योजनेतील रकमेप्रमाणेच लाडकी बहीण योजनेतील रक्कम देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीनं थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं  DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे
मुंबई:

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी राज्यातील महिलांच्या अकाऊंटवर 3 हजार रुपये जमा झाले. 31 जुलैपूर्वी या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. 

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील महिलांना याचा लाभ होणार आहे. जून आणि जुलै दोन महिन्यांचा हप्ता बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 17 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलंय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसे मिळणार पैसे?

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : केंद्र सरकारच्या विविध योजनेतील रकमेप्रमाणेच लाडकी बहीण योजनेतील रक्कम देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीनं थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

तुम्ही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केला असेल आणि तुमच्या अर्जाचे स्टेटस  Aprovel असेल तर तुमच्या खात्यात या योजनेचे हप्ते जमा होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हे हप्ते तुमचे डीबीटी स्टेटस सक्रीय (DBT Active) असेल तरच मिळेल. ज्या महिलांचे डीबीटी स्टेटस निष्क्रीय असेल (DBT Inactive) त्या महिलांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा होणार नाही. 

( नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा, वाचा कुणाला मिळाले 3 हजार रुपये )
 

2 मिनिटात करा स्टेटस चेक ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check) 

ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलाय त्या सर्वांना डीबीटी स्टेटस फक्त 2 मिनिटांमध्ये चेक करता येईल. तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॉम्पुटर किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तात्काळ हे स्टेट चेक करु शकता. त्यासाठी आम्ही सांगितलेली प्रोसेस क्रमवार पद्धतीनं (स्टेप बाय स्टेप) फॉलो करा. 

  •  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डीबीटी स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम आधार कार्डची  https://uidai.gov.in ही अधिकृत वेबसाईट सुरु करा
  • या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं Bank Seeding Status हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा
  • त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यावर तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा
  • आता कॅप्चा कोड भरा आणि  Send OTP बटणावर क्लिक करा
  • आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो टाकून व्हेरिफिकेशन करा
  • ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर DBT Status ओपन होईल ते चेक करा
  • तुमचे डीबीटी स्टेटस अ‍ॅक्टिव्ह असेल तर निर्धास्त राहा. दर महिन्याला तुमच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा होईल.
  • तुमचे डीबीटी स्टेटस अ‍ॅक्टिव्ह नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेशी संपर्क साधून ते अ‍ॅक्टिव्ह करा  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
जालना- बीड मार्गवर बस ट्रकचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं  DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे
Ajit pawar group leader irshad jagirdar will join samajwadi party dhule political news
Next Article
Dhule Politics : अजित पवार गटाला मोठा धक्का, धुळ्यातील बडा नेता पक्षाची साथ सोडणार