Pune News: भीमाशंकर मंदिर कधीपर्यंत बंद राहणार? पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी आता दिली मोठी अपडेट

मंदिराचे सभामंडप आणि पायाभूत सुविधांची काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने मंदिर आता 15 जूनपर्यंत बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Bhimashankar Temple News
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी 

Pune Bhimashankar Temple latest Update : पुणे जिल्ह्यातील पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.31 मेपासून दर्शन सुरू होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.मात्र सभामंडप आणि पायाभूत सुविधांची काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने मंदिर आता 15 जूनपर्यंत बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे 9 जानेवारीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शन बंद करण्यात आले आहे.मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये आणि भाविकांच्या सुरक्षिततेला बाधा येऊ नये,यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला होता.सध्या मंदिर परिसरातील कामे युद्धपातळीवर सुरू असून सभामंडपाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Baramati News: बारामतीत NCP अजित पवार गटाच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा, विधवा महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

दर्शन व्यवस्था सुरू करण्यास आणखी काही दिवस लागणार

मात्र सभामंडपाचा मुख्य दगड बसविण्याचे काम तसेच काही पायऱ्यांचे बांधकाम अद्याप शिल्लक असल्याने मंदिराचे उद्घाटन आणि दर्शन व्यवस्था सुरू करण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत.जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मंदिर 15 जूनपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार असून त्यानंतर दर्शन व्यवस्था सुरू करण्याचे नियोजन आहे.दरम्यान, 31 मेपासून मंदिर खुले होणार असल्याची माहिती अनेक भाविकांपर्यंत पोहोचल्याने आज मोठ्या संख्येने भाविकांनी भीमाशंकरकडे जाण्यासाठी गर्दी केली. 

मात्र मंदिर बंद असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घोडेगाव येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून भाविकांना पुढे जाण्यापासून रोखले आणि मंदिर अद्याप बंद असल्याची माहिती दिली.मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे सुरक्षितपणे आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन दक्षता घेत असून भाविकांनी 15 जूनपूर्वी भीमाशंकरकडे जाण्याचे टाळावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.