माजी खासदार सुरेश कलमाजी आणि काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर कॉमनवेल्थ गेम्स वरून घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांचा काही दोष नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना अनेक वर्षांनी या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. कलमाडी हे त्यावेळी काँग्रेसचे खासदार होते. शिवाय त्यांच्यावर कॉमनवेल्थ गेम्सची जबाबदारी देण्यात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2010 मध्ये दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्स (CWG) झाले होते. यासाठी विविध प्रकारची कामे आणि कंत्राटे दिली गेली होती. या कॉमनवेल्थ वेळी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षाने केला होता. यावरून सीबीआय आणि इडी या संस्थांनी स्वतंत्र चौकश्या सुरू केल्या होत्या.या प्रकरणात कॉमनवेल्थ गेम्स ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, सरचिटणीस ललित भनोट, आणि इतर अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
ED ने या प्रकरणात मनी लॉन्डरिंग (Money Laundering) संदर्भात चौकशी केली. चौकशीत, ED ला असे आढळले की आरोप पुरेशा प्रमाणात सिद्ध होत नाहीत. शिवाय त्यांच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा आढळलेला नाही. पैशांची अनधिकृत देवाणघेवाण किंवा आर्थिक गैरव्यवहार थेट या व्यक्तींशी जोडता आला नाही हे ही या चौकशीत समोर आले. त्यामुळे ED ने कोर्टात Closure Report सादर केला आहे. शिवाय कलमाडी, भनोट व इतरांवर पुढे खटला चालवण्यास कारण नाही, असं ही स्पष्ट केलं आहे.
यावर दिल्ली कोर्टाने निर्णय दिला आहे. दिल्लीतील विशेष पीएमएलए कोर्टाने ED च्या Closure Report ला मान्यता दिली आहे. सुरेश कलमाडी, ललित भनोट आणि इतरांना या प्रकरणातून क्लीन चिट देण्यात आली आहे. कोर्टाने सांगितले की, या व्यक्तींविरुद्ध पुढील तपास किंवा खटला चालवण्याचे कारण दिसत नाही. या निर्णयामुळे सुरेश कलमाडी, ललित भनोट आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्डरिंग संदर्भातले सर्व आरोप अधिकृतपणे संपले आहेत.