जाहिरात

Pahalgam attack: हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप, POK मधील दहशतवादी तळाची 'अशी' झाली स्थिती

हे दहशतवादी या लाँच पॅडवर खाण्यापिण्याची आणि शस्त्रांची व्यवस्था करून राहतात. संधी मिळताच ते भारतीय सीमेत घुसून दहशतवादी कृत्य करत असतात.

Pahalgam attack: हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप, POK मधील दहशतवादी तळाची 'अशी' झाली स्थिती
नवी दिल्ली:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना भयंकर शिक्षा देण्याचा भारताच्या निर्धारामुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तान मदतीसाठी तडफडत आहे. रशिया आणि चीनला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा जवळचा  मित्र चीन त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसत आहे. तुर्की देखील शस्त्रास्त्रांनी त्यांना मदत करत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांमध्येही खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनुसार, पीओकेमधील दहशतवाद्यांचे तळ रिकामे केले जात आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने पीओकेमधील सातपेक्षा जास्त दहशतवादी लाँच पॅडवरून दहशतवाद्यांना पाक सैन्याच्या आश्रयात राहण्याचे आदेश दिले आहेत. लीपा, जुरा, दुधनियाल, केल, शारदी, सरदारी, कोटली येथील दहशतवाद्यांचे सात लाँच पॅड रिकामे करण्यात आले आहेत. या लाँच पॅडमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या पाकिस्तानातील तीन महत्त्वाच्या छावण्यांमधून प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी तैनात केले जातात.

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानी 'जोकर' बरळले, आफ्रिदी- भुट्टोला ओवैसींनी धुधू धुतले!

हे दहशतवादी या लाँच पॅडवर खाण्यापिण्याची आणि शस्त्रांची व्यवस्था करून राहतात. संधी मिळताच ते भारतीय सीमेत घुसून दहशतवादी कृत्य करत असतात. पाकिस्तानच्या सैन्याला भीती आहे की भारत या लाँच पॅडचे नुकसान करू शकतो, त्यामुळे त्यांनी तोंडी आदेश जारी करून पीओकेमधील हे सर्व लाँच पॅड रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती सुत्रांच्या माध्यमातून पुढे आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यावर काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान, CM फडणवीस संतापले, सडकून टीका केली!

दुसरीकडे, बलुचिस्तानमध्ये ज्या प्रकारे एका ट्रेनचे अपहरण करण्यात आले, पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला झाला, त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्यातील अंतर्गत परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनुसार, बलुचिस्तानमधील या दोन्ही घटनांनंतर पाकिस्तानच्या सैन्यातील अनेक जवानांनी नोकरी सोडली आहे, त्यामुळे पाकिस्तानची सेना आणि आयएसआय (ISI) अधिकच बिथरले आहेत.