BMC Election 2026: भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी! ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा दारूण पराभव

BMC Election: अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर आणि तेजस्वी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही जागा ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, मतदारांनी तेजस्वी घोसाळकर यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

BMC Election Result: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दहिसर येथील प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या उमेदवार तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी १०,७२५ मतांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

राजकीय संघर्षात मोठे यश

अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर आणि तेजस्वी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही जागा ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, मतदारांनी तेजस्वी घोसाळकर यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

प्रचारादरम्यान तेजस्वी घोसाळकर अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनी मांडलेले विकासाचे व्हिजन आणि मिळालेली सहानुभूती यामुळे त्यांना हे मोठे यश मिळाले आहे.

(नक्की वाचा-  Maharashtra Election Result LIVE: पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची आघाडी, प्रशांत जगताप, रुपाली ठोंबरे पिछाडीवर)

प्रभाग २ मध्ये 'शिवसेना (UBT) - मनसे' युतीचे मोठे आव्हान होते. मात्र, १०,७२५ मतांचा हा फरक दर्शवतो की तेजस्वी घोसाळकर यांनी सर्वच प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. निकालाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी दहिसर परिसरात मोठा जल्लोष सुरू केला असून गुलालाची उधळण केली जात आहे.

Advertisement