TISS Report : 2051 पर्यंत हिंदू अल्पसंख्याक होतील? TISS चा रिपोर्ट पुन्हा व्हायरल; भाजपचं काय आहे म्हणणं?

टीसच्या या रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आलंय की, कडक पावलं उचलली नाही तर मुंबईचा भूगोल आणि इतिहास दोन्ही बदलू शकतो. 

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल साइंसेस की रिपोर्ट के अनुसार मुंबई में 2050 तक हिंदुओं की आबादी घटकर 54% रह जाएगी
  • मुंबई में अवैध बांग्लादेशी और रोहिंग्या घुसपैठियों के बढ़ने से शहर की सामाजिक पहचान खतरे में बताई गई है
  • रिपोर्ट में कहा गया है कि मुंबई से बांग्लादेश हर महीने बड़ी रकम भेजी जा रही है जिससे आर्थिक नुकसान हो रहा है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

Tata Institute of Social Sciences (TISS) report  : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट समोर आल्याने खळबळ उडाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत TISS ने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेला रिपोर्ट पुन्हा व्हायरल होत आहे.  २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टमुळे मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला आहे. भाजपनेही पुन्हा एकदा यावर चिंता व्यक्त केली आहेय 

भाजप नेता किरीट सोमय्या म्हणाले, बांगलादेशात हिंदूंच्या हत्येच्या घटना समोर येत आहेत, हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्याचवेळी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांचं आक्रमण सुरूच आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी त्यांच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं, २०५० पर्यंत मुंबईत हिंदूंच्या संख्येत घट होऊन ५४ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आणि मुस्लिमांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत पोहोचेल. 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ सोशल सायन्स TISS चा  रिपोर्ट 'Illegal Immigrants to Mumbai' ने मुंबई शहराच्या भविष्यावर सवाल उपस्थित केला. अवैध घुसखोरी केवळ मुंबईतील संसाधनं उद्ध्वस्त करीत नाही तर शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्याचाही प्रयत्न करीत असल्याचं दिसून येत आहे. 


धोक्याची घंटा :

या रिपोर्टनुसार, मुंबईत १९६१ मध्ये हिंदूची लोकसंख्या ८८ टक्के होती, त्यात २०११ पर्यंत घट झाली असून ती ६६ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. २०५१ पर्यंत यात अधिक घट होऊन ५४ टक्क्यांहून कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे मुस्लिमांची लोकसंख्या १९६१ पेक्षा ८ टक्क्यांनी वाढून २०११ मध्ये २१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. २०५१ पर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले असा अंदाज आहे.   

घुसखोरांच्या मतपेटीचा खेळ

रिपोर्टमध्ये आरोप केला आहे की, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोऱ्यांचा वापर काही राजकीय पक्ष मतपेटीप्रमाणे करीत आहेत. बनावटी कागदपत्रांच्या आधारे यांचं नाव मतदार यादीत सामील करून घेतलं जातं. ज्यामुळे देशाच्या लोकशाहीला मोठा धाका निर्माण झाला आहे. 

Advertisement

झोपडपट्ट्यांवर नियंत्रण, संसाधनांची लूट

मुंबईतील झोपडपट्टींच्या अवस्थेवर या रिपोर्टमध्ये दिल्यानुसार, अवैध प्रवाशांमुळे मुंबईतील झोपडपट्टींमध्ये मोठी गर्दी झाली आहे. ज्यामुळे वीज, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण सारख्या सरकारी सेवांवर अतिरिक्त भार पडत आहे. अवैध घुसखोर कमी पैशात मजुरी करायला तयार होतात, त्यामुळे मुंबईतील स्थानिक मजुरांना त्यांचा हक्क मिळत नाही. या रिपोर्टमधील सर्व्हेनुसार, ५० टक्क्यांहून अधिक महिलांची तस्करी केली जात असून त्यांना देहविक्रय व्यापारात ढकललं जात असल्याचंही सांगितलं जात आहे. 

TISS Tata Institute Mumbai Report Muslims Bangladeshi 

मुंबईतील पैसे बांगलादेशात....

घुसखोरांचा एक मोठा भाग साधारण ४० टक्के दर महिने दहा हजार रुपयांपासून १ लाखांपर्यंतची रक्कम बांगलादेशात पाठवत आहे. म्हणजेच मुंबईच्या मेहनतीची कमाई दुसऱ्या देशात जात आहे. टीसच्या या रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आलंय की, कडक पावलं उचलली नाही तर मुंबईचा भूगोल आणि इतिहास दोन्ही बदलू शकतो. 

Advertisement

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या वातावरणात हा रिपोर्ट पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा प्रमुख केंद्र बनला आहे.