मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, 'या' कर्मचाऱ्यांच्या भत्‍त्‍यामध्‍ये 6 हजार रूपयांची वाढ

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या आश्रय योजना अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यातील सफाई कामगारांच्‍या विस्‍थापन भत्‍त्‍यामध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या आश्रय योजना अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यातील सफाई कामगारांच्‍या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्‍यात येणा-या विस्‍थापन भत्‍त्‍यामध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे. ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबर 2024 च्‍या मासिक वेतनात जुलै 2024 आणि ऑगस्‍ट 2024 या दोन महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सध्या महानगरपालिका सेवा सदनिकाधारक सफाई कामगारास विस्‍थापन भत्‍ता १४ हजार रूपये आणि दरमहा घरभाडे भत्‍ता अदा करण्‍यात येतो. या भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात केली होती. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं  विस्‍थापन भत्‍त्‍यात ६ हजार रूपयांची वाढ केली आहे. त्‍यामुळे विस्‍थापन भत्‍ता आता दरमहा 20 हजार रूपये करण्यात आला आहे.  

( नक्की वाचा : 1 ऑगस्टपासून देशभरात 5 मोठे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम ! )
 

सप्‍टेंबर 2024 च्‍या मासिक वेतनात जुलै आणि ऑगस्‍ट महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे दिले जाईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

Topics mentioned in this article