Govinda Audio Clip : गोळीबारानंतर गोविंदाची ऑडिओ क्लीप समोर, काय म्हणाला?

गोविंदा पहाटे 4.45 च्या सुमारास त्याच्या जुहू येथील घरातून निघणार होता. त्यावेळी चुकून त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार झाला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली.

Advertisement
Read Time: 2 mins

बॉलीवूड अभिनेता गोविंदा मंगळवारी गोळी लागल्याने जखमी झाला आहे. त्याच्या लायसन्स रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर गोविंदाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर जुहू येथील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याला लागलेली गोळी काढण्यात आली असून तो सुखरू आहे. 

गोविंदाने स्वतःच्या तब्येत ठीक असल्याची माहिती सर्वांना दिली आहे. गोविंदाने म्हटलं की, "तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि देवाच्या कृपेने मी सुखरुप आहे. मला गोळी लागली होती, मात्र ती काढण्यात आली आहे. मी डॉक्टरांचे आभार मानतो. तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद." गोविंदाचा आवाजावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की त्याला झालेली दुखापत गंभीर आहे. सुदैवाने गोविंदा या घटनेत थोडक्यात बचावला आहे. 

(नक्की वाचा -  Actor Govinda Hospitalised: अभिनेता गोविंदाला गोळी लागल्याने जखमी, रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू)

गोळी कशी लागली?

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाला कोलकात्याला जायचे होते, त्यामुळे तो सकाळी लवकर उठला आणि रिव्हॉल्वर घेऊन जीममध्ये गेला. जीममधून घरी आल्यानंतर तो रिव्हॉल्वर कपाटात ठेवत असताना त्याची तपासणी करत असताना चुकून त्याच्या हातातून रिव्हॉल्वर निसटली. त्यावेळी रिव्हॉल्वरमधून गोळी  सुटली आणि त्याच्या डाव्या पायाला लागली. 

(नक्की वाचा: Rajinikanth Hospitalised: सुपरस्टार रजनीकांत चेन्नईतील अपोला हॉस्पिटलमध्ये दाखल

पोलिसांना याबाबत सांगितलं की, गोविंदा पहाटे 4.45 च्या सुमारास त्याच्या जुहू येथील घरातून निघणार होता. त्यावेळी चुकून त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार झाला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. अभिनेत्याने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. गोविंदाच्या मॅनेजरने म्हटरलं की, "आम्हाला कोलकाता येथे एका कार्यक्रमासाठी सकाळी 6 वाजता उड्डाण करायचे होते. मी विमानतळावर पोहोचलो होतो. हा अपघात झाला तेव्हा गोविंदाजी विमानतळावर येण्यासाठी त्यांचे घर सोडणार होते.