Kalyan Building Collapsed Viral Video : कल्याणमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी री-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला.इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून ही इमारत पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका
कल्याण पश्चिम येथील घोलप नगर परिसरात शेतकरी निवासी परिसरात एक इमारत अचानक कोसळली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, या परिसरात असलेली ही इमारत अतिधोकादायक झाली होती. गेल्या अनेक दिवसापासून या इमारतीबाबत पाठपुरावा केला जात होता. ही इमारत एका विकासाकडे डेव्हलोपमेंटसाठी देण्यात आली होती. या इमारतीमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला होता.
नक्की वाचा >> Pune News: बायकोने अनैतिक संबंधाबाबत विचारलं, नवऱ्याची सटकली अन् घरच पेटवलं..पुण्यात भयानक घडलं
कोसळलेल्या इमारतीचा थरारक व्हिडीओ पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर या इमारतीवर संबंधित बिल्डर आणि कंत्राटदाराने पाडकाम सुरू केलं. मात्र इमारत पाडताना कंत्राटदाराने कोणत्याही उपाययोजनांची खबरदारी घेतली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना धक्का बसला आणि ते घर सोडून बाहेर आले.
नक्की वाचा >> Ahilyanagar News: श्रीरामपुरात कडकडीत बंद! त्या हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला, नंतर जे घडलं..
या संदर्भात केडीएमसी अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, ही बिल्डिंग एका विकासाकडे विकासासाठी घेतली आहे. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.