मोकाट जनावरांचा फटका एखाद्या शाळेलाही बसू शकतो याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगरमध्ये आला. शहरातील एका शाळेत रेडा घुसल्याची घटना समोर घडली आहे. रेडा अचानक शाळेत घुसल्याने एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी घाबरले. त्यात रेडाही बिथरला. त्यात तो सैरावैरा पळू लागला. त्यात त्याने काही विद्यार्थ्यांना धडक ही दिली. त्यात 13 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती संभाजीनगर शहरातील टाऊन हॉल येथे मॉडेल इंग्रजी शाळा आहे. शाळा सकाळीच्या वेळी भरली होती. विद्यार्थी आपल्या वर्गात होते. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते. कोणाच्या मनीध्यानी नसताना सकाळी साडे दहाच्या सुमारास शाळेत रेडा घुसला. रेडा घुसलेला पाहून काही विद्यार्थी घाबरले. रेडा इकडे तिकडे पळत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही धावपळ उडाली. सगळीकडे गोंधळाचं वातावरण निर्माण झाले.
या सर्व गोंधळात रेडाही बिथरला. तो शाळेच्या आवारात इकडे तिकडे पळू लागला. विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणात शाळेत होते. त्यामुले ते ही एका ठिकाणी जमा झाले. अशा वेळी रेड्यांनी काही मुलांना जोरदार धडक दिली. त्यात 13 विद्यार्थी जखमी झाले. त्यातील एक विद्यार्थी गंभीर आहे. काहींच्या हाताला तर काहींच्या पायाला जबर मार लागला आहे. हा रेडा शाळेत अचानक कसा काय घुसले हे समजू शकले नाही. मात्र त्यांच्या शाळेत घुसण्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र भितीचे वातावरण पसरले.