भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षापासून आजारी आहे. युरेन इन्फेक्शनसह पायाला होणाऱ्या वातामुळे तो हैराण आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या आकृती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला त्याने चांगला प्रतिसाद दिला. त्याच्या प्रकृतीतही सुधारणा झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून घरी जात असताना विनोद कांबळीने आपल्या खास अंदाजात रुग्णालयाचे आभार मानले. शिवाय क्रिकेटचे एक-दोन हातही त्याने रुग्णालयाच्या लॉबीमध्येच अजमावले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विनोद कांबळीला तब्येत बिघडल्याने उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. युरेन इन्फेक्शन, कावीळ, शरीरात अशक्तपणा, हाता पायांना वात येणे याचा त्याला त्रास होत होता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्याने पुष्पा स्टाईल मारत झुकेगा नही साला असाच संदेश दिला. शिवाय आजाराला हवरून आपण पुन्हा मैदानात उतरु असं दाखवून दिलं. त्यानंतर तो जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी रुग्णालयातील स्टाफने क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला.
तो आग्रह विनोद कांबळीने मान्य केला. आता एकही चेंडू सोडणार नाही. चौकार षटकार ठोकणार असं विनोद म्हणाले. रुग्णालयाच्या लॉबीतच मग त्याने हातात बॅट घेतली. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. मग सिक्स मारा असा आग्रही केला गेला. विनोदनंही त्यांना नाराज केलं नाही. पुढच्याच चेंडूवर षटकार ही ठोकला. यावेळी विनोदचा उत्साह पाहण्यासारखा होता. तो स्वत:च्या पायावर चालताना दिसला. बोलतानाही उच्चर स्पष्ट होते. पहिल्या पेक्षा यावेळी विनोदची तब्बेत चांगली वाटत होती. बरं वाटत असल्यानं आणि घरी जात असल्याने विनोद आनंदी होता.
यावेळी बोलताना विनोदने या लोकांनी मला फिट केलं आहे. मी ही आधी सांगितलं होतं फिट होवूनच घरी येणार. आता मी फिट झालो आहे. त्याचे श्रेय अकृती रुग्णालयातील डॉक्टरांचे आहे असंही त्याने सांगितले. शिवाय या लोकांनी मला घरी जाण्या आधी थोडी क्रिकेटची प्रॅक्टीसही दिली. मी आता शिवाजीपार्कात ही परतणार आहे. कधीच क्रिकेट सोडणार नाही. मी खेळत राहणार. मी लवकरच मैदानात दिसेन असंही तो म्हणाले. अनेकांनी मला या काळात प्रेम दिलं. विश्वास दिला त्याबद्दल त्याने आभार मानले.
ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad: वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीत 31st कसा झाला? वाचा Inside Report
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरी जात असताना आनंद होत आहे असं विनोद कांबळी म्हणाला. नवीन वर्षाचे सर्वांनी स्वागत करावे. नवीन वर्ष एन्जॉय करावे. पण कुणीही दारू पिऊ नये असंही आवाहनही विनोद कांबळी याने केले. मी घरी जात आहे. घरी आपली पत्नी माझी वाट पाहात आहे. माझी मुलगी आणि मुलगा ही आपली वाट पहात आहे. आपण फिट होवून घरी येणार असं त्यांना सांगितलं होतं. त्यानुसार आपण घरी फिट होवून जात आहे असंही तो यावेळी म्हणाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world