Bullet Train Shilphata To Ghansoli Tunnel : मुंबई-अहमदाबाद बुले ट्रेन प्रकल्पाने आज महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. शीळफाटा ते घणसोली बोगदा आज पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कंट्रोल ब्लास्टिंगच्या मदतीने बोगद्याच्या शेवटचा भाग तोडण्यात येईल. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वत: उपस्थित होते. हा बोगदा तब्बल पाच किमी लांबीचा असून बीकेसी ते शीळफाटा दरम्यान 21 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा महत्त्वाचा हिस्सा आहे. यामध्य़े ठाणे खाडीच्या खाली 7 किमी मार्गाचा समावेश आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सचं स्टेशन कसं असेल?
हा प्लॅटफॉर्म जमिनीखाली साधारण 26 मीटर खोल तयार करण्याची योजना आहे. स्टेशन तीन मजली असेल, बेसमेंट वन सर्विस फ्लोअर म्हणून ओळखला जाईल. या मजल्यावर तांत्रिक आणि ऑपरेशनल काम चालेल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर 12 स्टेशन असतील. ज्यामधील बीकेसी एकमेव अंडरग्राऊंड स्टेशन असेल. स्टेशन तयार करण्यासाठी साधारण 32.5 मीटर खोल खड्डा खणण्यात येत आहे. जो दहा मजली इमारती इतका असेल. यामध्ये सिक्युरिटी रूम, स्टाफ रूम, लॉकर रूम आणि बॅक ऑफिस असेल. बेसमेंटमध्ये तीन प्लॅटफॉर्म असतील, एकूण सहा प्लॅटफॉर्म असतील आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी साधारण 495 मीटर असेल.
नक्की वाचा - Mumbai Cruise Terminal: 10 लाख प्रवासी क्षमता, 72 चेक-इन पॉइंट; भारतातील सर्वात मोठं क्रुझ टर्मिनलचं उद्घाटन
मेट्रो आणि रोडला कनेक्टिव्हिटी
स्टेशनमध्ये एक एन्ट्री आणि एक एग्झिट पॉइंट असेल. बुलेट ट्रेनच्या स्टेशनचा एक मार्ग मेट्रो लाइन 2बी स्टेशन (ILFS) ला जोडेल तर दुसरा रस्तेमार्गाने MYNL इमारतीच्या दिशेने असेल. नैसर्गिक प्रकाशासाठी स्टेशनच्या आत स्कायलाईट्स देखील बसवल्या जातील. एकूणच, हे स्टेशन मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन बांधले जात आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी पूर्ण होणार?
बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होईल
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर किती स्थानकं असतील?
12 स्टेशन
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन तिकीट किती असेल?
अद्याप हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार, हे तिकीट ३ ते ५ हजारांदरम्यान असू शकेल.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन
मुंबई (बीकेसी)
ठाणे
विरार
बोईसर
वापी
बिलीमोरा
सुरत
भरूच
बडोदा
आनंद
अहमदाबाद
साबरमती