Byculla building collapse : मुंबईतील भायखळा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. येथील हबीब मॅन्शन (Habib Mansion), हंस रोड, भायखळा (पश्चिम) या ठिकाणी सुरू असलेल्या एका इमारतीच्या पायाभरणी आणि ढिगाऱ्याच्या (Foundation and Piling) कामादरम्यान माती आणि चिखलाचा काही भाग कामगारांवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.
काय आहे दुर्घटना?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एकूण 5 कामगार मातीखाली दबले गेले होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील 2 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे, तर उर्वरित 3 कामगार जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Amravati News : अमरावतीत किन्नर महामंडलेश्वरांच्या बळजबरी धर्मांतराचा गंभीर प्रकार! पोलिसांवर गंभीर आरोप )
मृत आणि जखमी कामगारांची नावे
- राहुल - वय 30 वर्षे, मृत
- राजू -वय 28 वर्षे, मृत
- सज्जाद अली, - वय 25 वर्षे, उपचार सुरु प्रकृती स्थिर
- सोबत अली - वय 28 वर्षे, उपचार सुरु प्रकृती स्थिर
- लाल मोहम्मद - वय 18 वर्षे, उपचार सुरु प्रकृती स्थिर
ही दुर्घटना आज, (शनिवार, 15 नोव्हेंबर) दुपारी 2 वाजून 41 मिनिटांनी घडली असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे भायखळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.