Mumbai News: प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून 34 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या, पाहा संपूर्ण यादी

उन्हाळी हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसीदरम्यान 34 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Central Railway 34 Summer Special Train Timetable

राहुल वाघ, प्रतिनिधी 

Central Railway Latest News :  रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उन्हाळी हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसीदरम्यान 34 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस सुलतानपूर साप्ताहिक विशेष गाड्या, गाडी क्रमांक 04211 साप्ताहिक विशेष प्रत्येक गुरुवारी 21 मे 2026 ते 16 जुलै 2026 या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 2.35 वाजता सुटेल आणि सुलतानपूर येथे दुसऱ्या दिवशी 11 वाजता पोहोचेल. गाडी क्र.04212 साप्ताहिक विशेष प्रत्येक बुधवार दि.20 मे 2026 ते 15 जुलै 2026 या कालावधीत सुलतानपूर येथून 04.00 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 12.10 वाजता पोहोचेल.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: 'राजकारणात चोर आणि शायनर..' जिल्हाप्रमुख छाया वाघमारे भडकल्या, शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी साप्ताहिक विशेष गाड्यांचं वेळापत्रक 

लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी साप्ताहिक विशेष गाड्या गाडी क्र.04225 साप्ताहिक विशेष प्रत्येक शुक्रवार दि.22 मे 2026 ते 10 जुलै 2026 या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 14.35 वाजता सुटेल आणि वाराणसी येथे तिसऱ्या दिवशी 02.05 वाजता पोहोचेल.गाडी क्र.04226 साप्ताहिक विशेष प्रत्येक गुरुवार,दि.21 मे 2026 ते 09 जुलै 2026 या कालावधीत वाराणसी येथून 01.35 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 12.20 वाजता पोहोचेल.

नक्की वाचा >>  Pune News: अक्षय तृतीयानिमित्त पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीला उसळी, 'या' ठिकाणी ग्राहकांच्या रांगाच रांगा