Harbour Railway Sunday Mega Block Update : मध्य रेल्वेकडून महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे. उद्या रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजीचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यानिमित्ताने रद्द करण्यात आला आहे. मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे. याच दिवशी असणारा कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. महिला आंतरराष्ट्रीय विश्वचषक उपांत्य सामन्यापूर्वी हा मेगा ब्लॉक नियोजित करण्यात आला होता. सामना पाहण्यासाठी प्रवास करणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
रविवारीच्या वेळापत्रकानुसार हार्बर मार्गावरील गाड्या चालवल्या जाणार
हार्बर मार्गावरील गाड्या रविवारीच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांनी वेळापत्रकाच्या बदलांबाबतची नोंद घ्यावी, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण अनेकदा हार्बर मार्गावर रेल्वेच्या अभियांत्रिकी कामासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. त्यामुळे या दिवशी प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करून जादाचे पैसे मोजावे लागतात.
नक्की वाचा >> "दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसं आली, सर्व मराठीच, पण..", उद्धव ठाकरेंनी भाजपची केली पोलखोल!
रेल्वेच्या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींसह प्रवाशांना दिलासा
परंतु, उद्या रविवारी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. तत्पूर्वी मध्य रेल्वेनं क्रिकेटप्रेमींसह प्रवाशांना दिलासा दिला आहे. कारण 2 नोव्हेंबर 2025 रोजीचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यानिमित्ताने रद्द करण्यात आल्याचं मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे. मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार सुरुच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक नीट पाहूनच प्रवास करावा. जेणेकरून प्रवाशांची प्रवासादरम्यान तारंबळ उडणार नाही.
नक्की वाचा >> "दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसं आली, सर्व मराठीच, पण..", उद्धव ठाकरेंनी भाजपची केली पोलखोल!