जाहिरात

"दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसं आली, सर्व मराठीच, पण..", उद्धव ठाकरेंनी भाजपची केली पोलखोल!

Uddhav Thackeray Todays Speech : मागील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदार यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 'सत्याचा मोर्चा'चं हत्यार उपसलंय.

"दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसं आली, सर्व मराठीच, पण..", उद्धव ठाकरेंनी भाजपची केली पोलखोल!
Uddhav Thackeray Speech
मुंबई:

Uddhav Thackeray Todays Speech : मागील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदार यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 'सत्याचा मोर्चा'चं हत्यार उपसलंय. आज शनिवारी 1 नोव्हेंबरला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोधकांवर आरोपांची राळ उडवली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधकांचा समाचार घेतला. तसच निवडणूक आयोगावरही बोचरी टीका केली. "दोन दिवसांपूर्वी मी मातोश्रीत बसलो होतो. मला रवीनं सांगितलं, निवडणूक आयोगाची माणसं आली आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा..आता दिवाळी झाली दसरा झाला, हे कशाला आले? आता निवडणूक आली, त्यांना बोलावलं असणार..सर्व मराठी माणसं. त्यांचा काय दोष नाही..",असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

"माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्या प्रथम झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजुटी नाही, ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे. मतं चोरी करणाऱ्या सांगतोय की आज नुसती ठिणगी बघताय..या ठिणगीचा वणवा कधीही होऊ शकेल, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीत आहे", असं म्हणत उद्धव ठाकरेनी विरोधकांना मोठा इशारा दिला. 

शोलेचा डायलॉग म्हणत उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

विरोधकांवर टीका करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "शोले मध्ये एक डायलॉग आहे, दूर गाव में जब बच्चा रोता है, तो माँ केहती सो जा..नही तो गब्बर आएगा..तसं आज तुम्हाला सांगतोय, आज जागे झालात, जागे राहा..नाहीतर अॅनाकोंडा येईल. या अॅनाकोंडाला आता कोंडवावंच लागेल, नाहीतर हे सुधारणार नाहीत. रोज कुठून ना कुठून पुरावे येत आहेत. तरीसुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोगाने कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे, या पर्दाफाश मी करेन".

नक्की वाचा >> जॅकी श्रॉफच्या पुण्यातील फार्म हाऊसमध्ये टायटॅनिक स्पॉट, थिएटर, 700 झाडे अन्..नजारा पाहून फराह खानही झाली थक्क

"मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या साक्षीने आव्हान देत आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच. एकदाच करून टाका काय आहे ते..दूध का दूध, पाणी का पाणी.. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलं आहे की, मतं चोरी झाली आहे. मतं चोरी होते आहे. आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा..आपण दरवेळी म्हणतो की, महाराष्ट्र देशाला दाखवतो. आज हा संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रुपात एकवटला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय. पक्ष वगैरे बाजूला ठेऊन आपण एकवटले आहोत", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

त्या अर्जदाराचं नाव उद्धव  बाळासाहेब ठाकरे

उद्धव ठाकरे जनतेला संबोधीत करत म्हणाले, "मी तुमच्या खांद्यावर एक जबाबदारी टाकतोय. ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत..शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष सर्वांचे कार्यकर्ते करतायत. तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय, राज्यातील नव्हे तर देशातल्या..सर्वांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही, हे तपासा. आपल्या घरात आपली परवानगी न घेतलेली माणसं राहतायत की नाही, हे सुद्धा तपासा. कारण जर शौचालयात शंभर माणसं राहत असतील, तर तुमच्या घरात किती राहू शकतात.

नक्की वाचा >> निवडणूक आयोगाला राज ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'! 'दुबार मतदारां'चा ढिगारा दाखवत केला मोठा गौप्यस्फोट

सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता, हा अर्ज आम्ही केलेला नाही. असा अभिप्राय मिळाला आहे. त्याआधारे सदर अर्ज बाद करण्यात आला आहे. ज्याने हा अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने अर्ज कोणी केला हे माहितीच नाही. आता हा अर्जदार शोधायचा कुठे..तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. या माणसाने ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा अर्ज केला आहे. हे उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहित नाही. त्याच्यावर मोबाईल नंबर खोटा आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com