Chhatrapati Sambhajinagar : महायुती सरकारचे मंत्री संजय शिरसाट यांच्या समोरील संकटे कमी होताना दिसत नाहीत. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर आणखी एक नवीन आरोप केला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोपी इम्तियाज जलील यांनी केला आहे.
प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्यांना मिळणारे मोफत टॅब्लेट देण्यास टाळाटाळ केल्याचं बोललं जात आहे. विद्यार्थ्यांनी अनेकवेळा मागणी केल्याने त्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर जलील यांनी केला आहे. पोलिसांना बोलावून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचाही आरोप आहे. मात्र आता शेकडो विद्यार्थ्यांसह क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
Advertisement
Topics mentioned in this article