'NDTV मराठी' इम्पॅक्ट; विद्यादीप बालगृहातून मुली पळून गेल्याचे प्रकरण; शासनाचा मोठा निर्णय

यापूर्वीच विद्यादीप बालगृहाची परवानगी रद्द करण्यात आली होती. आता या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने थेट जिल्हा बाल कल्याण समितीलाच बरखास्त केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहातून 9 मुली पळून गेल्याच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या NDTV मराठीच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. या गंभीर प्रकरणात शासनाने आता कठोर पाऊल उचलले असून, छत्रपती संभाजीनगरची जिल्हा बाल कल्याण समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेला समितीचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणाच जबाबदार असल्याचे शासनाने काढलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

विद्यादीप बालगृहातील मुली पळून गेल्याच्या घटनेनंतर पहिल्या दिवसापासून NDTV मराठीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. बालगृहातील मुलींची आपबीती आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार महाराष्ट्रासमोर आणण्याचे काम केले. त्यानंतर महिला व बालकल्याण समितीवर झालेले गंभीर आरोपही सर्वांसमोर आणले. या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर शासनाला या प्रकरणात लक्ष घालून कठोर निर्णय घ्यावा लागला.

(नक्की वाचा- Vasai News: उच्चशिक्षित तरुणीचा कारनामा; बहिणीच्या घरी दीड कोटींचा दरोडा, चोरीचं कारण ऐकून थक्क व्हाल)

यापूर्वीच विद्यादीप बालगृहाची परवानगी रद्द करण्यात आली होती. आता या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने थेट जिल्हा बाल कल्याण समितीलाच बरखास्त केले आहे. बाल कल्याण समितीच्या सदस्यांचा निष्काळजीपणा आणि कर्तव्यपालनातील त्रुटी यांमुळेच ही घटना घडल्याचे शासनाच्या चौकशीत निष्पन्न झाले.

समिती बरखास्त झाल्यानंतर तिचा अतिरिक्त कार्यभार परभणीच्या बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील बालकांच्या हितासाठी आवश्यक असलेली कामे थांबू नयेत, याची काळजी घेण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बालगृहांमध्ये काम करणाऱ्या संस्था आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या समितींनाही आता अधिक जबाबदारीने काम करावे लागेल, असा स्पष्ट संदेश मिळाला आहे.

Advertisement

(नक्की वाचा - Kalyan News : कल्याणमध्ये चिमुकलीचं अपहरण अन् हत्या! खून पचला होता पण 8 महिन्यांनी मावशी-काका निघाले मारेकरी)

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामधून पळालेल्या मुलींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालगृहातील मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती. मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती. त्यामुळे मुली अनेक दिवस एकाच आजाराने ग्रासलेल्या राहायच्या. त्यानेदेखील मुली बऱ्या झाल्या नाही तर पवित्र पाणी शिंपडून अथवा शरीरावर वेगळी चिन्हे काढून त्यांना आता तुम्ही बऱ्या व्हाल असा दावा केला जायचा.