CIDCO Lottery 2025: सिडको माझे पसंतीचे घर सर्वांनाच मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज?

26 हजार घरांसाठी तब्बल दिड लाखा पेक्षा जास्त अर्ज आले होते. वाढणारा प्रतिसाद पाहाता सिडकोनेही अर्ज भरण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी मुंबई:

'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेसाठीची 15 फेब्रुवारीला लॉटरी काढली जाणार आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर या योजनेची घोषणा करण्यात आली होती. जवळपास 26,000 घरांसाठी ही लॉटरी काढली जाणार आहे. सुरूवातीला या योजनेसाठी जवळपास 1 लाख 60 हजार अर्ज आले होते. मात्र ज्या वेळी घरांच्या किंमती जाहीर झाल्या त्यानंतर मात्र अर्ज करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. शिवाय अनामत रक्कम भरणाऱ्यांकडे ही लोकांनी पाठ फिरवली. त्यामुळे 26,000 घरांसाठी तेवढेही अर्ज आले नाहीत. त्यामुळे ज्या अर्जदारांनी पसंतीच्या घरासाठी अर्ज केले आहेत त्या प्रत्येकाला घर मिळण्याची दाट शक्यता मात्र या मुळे निर्माण झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजे 12 ऑक्टोबर 2024 ला सिडकोने माझे पसंतीचे घर या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत 26,000 घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरं उपलब्ध आहेत. सर्वांना परवडतील अशा दरात ही घरं उपलब्ध करून देण्यात येतील असं सिडको तर्फे सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सुरूवातीला या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 26  हजार घरांसाठी तब्बल दिड लाखा पेक्षा जास्त अर्ज आले होते. वाढणारा प्रतिसाद पाहाता सिडकोनेही अर्ज भरण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 26 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. तर अनामत रक्कम दाखल करण्याची 31 जानेवारी ही शेवटची तारीख होती. 

31 जानेवारीपर्यंत सिडकोकडे 21 हजार 399 जणांना अनामत रक्कम भरली आहेत. हे अर्जदार लॉटरीसाठी पात्र ठरले आहेत. तर अनेकांनी 31 तारखेनंतर अनामत रक्कम भरली आहे. त्यांना मात्र अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे 26,000  घरांसाठी 21 हजार 399 जणांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे या सर्वांना ही घरे मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट आहेत. शिवाय यातील कुठल्या ठिकाणी जास्त अर्ज आले आहेत ते महत्वाचे ठरणार आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतीक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

आता सिडकोने अर्ज केलेल्या अर्जदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशल माडियीवर एक याबाबत पोस्ट केली आहे. त्यात  सर्व अर्जदारांचे मन:पूर्वक आभार ! तुमच्या उदंड प्रतिसादामुळे माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार झाला आहे. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सोडत संकेस्थळावर प्रकाशित होणार आहे. अधिक माहितीसाठी https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट द्या. अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोची ही बहुप्रतिक्षित सोडत 15 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे हे स्पष्ट आहे. 

Advertisement


EWS म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक 

तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख 
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख 
खारघर बस डेपो - 48. 3 लाख 
बामणडोंगरी -31. 9 लाख 
खारकोपर  2A, 2B -38.6 लाख 
कळंबोली बस डेपो  - 41.9 लाख 

Advertisement

LIG अल्प उत्पन्न गट 

पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख 
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख 
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख 
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख 
खारकोपर ईस्ट - 40.3 लाख 
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख 
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख