CIDCO News: सिडको घरांच्या किंमती जाहीर, पण ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना येतोय मेजर प्रॉब्लेम

https://cidcofcfs.cidcoindia.com या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याच प्रयत्न केला. मात्र त्यात वारंवार एरर येत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी मुंबई:

सिडकोने जवळपास 4508 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना जाहीर केली आहे. त्यानुसार 22 नोव्हेंबरसाठी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. मात्र ऑनलाईन अर्ज दाखल करताना मेजर प्रॉब्लेम येत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे घरासाठी अर्ज भरू  इच्छीणाऱ्या लोकांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाला आहे. दरम्यान सिडकोने ज्या घरांसाठी ही योजना जाहीर केली आहे ती घरं मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या किंमती किती असणार याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार त्याची किंमतही जाहीर करण्यात आली आहे. शिवाय अर्जा सोबत अनामत रक्कम किती भरायची हे ही यातून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

सिडकोने जाहीर केलेली योजना ही EWS आणि LIG गटासाठी आहे. ज्यांचे उत्पन्न सहा लाखांपर्यंत आहे त्यांना EWS च्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. ज्यांचे उत्पन्न हे 6 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना LIG त्या घरांसाठी अर्ज करता येईल. ही घरं तळोजा, द्रोणागिरी, खारघर,घणसोली आणि कळंबोली भागात आहेत. यातील सर्वात स्वस्त घर हे EWS प्रवर्गात असून त्याची किंमत ही 21 लाख 71 हजार 556 इतकी आहे. यात प्रवर्गात सर्वात महाग घराची किंमत ही 26 लाख 49 हजार 717 रूपये आहे. हे घर खारघर आणि कळंबोली इथं उपलब्ध आहे. तर बाकीची घरं ही तळोजा आणि द्रोणागिरी, घणसोली इथं आहेत. 

नक्की वाचा - CIDCO News: भारी घरं, जबरदस्त लोकेशन! सिडकोतर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' 4508 घरांची भन्नाट योजना

LIG प्रवर्गातील घरांच्या किंमती ही जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वात महाग घर हे खारघरमध्ये 37 लाख 95 हजार 172 रूपये आहे. तर कळंबोली इथल्या घराची किंमत ही 37,47,158 रूपये इतकी आहे. तर तळोजा इथल्या घरांची किंमत ही 30 लाख 58 हजार 578 रूपये इतकी आहे. द्रोणागिरी इथल्या घरांची किंमत ही 30 लाख 17 हजार 682 रूपये आहे. तर घणसोली इथल्या घरांच्या किंमती या 36 लाख 72 हजार 505 इतकी आहे. अर्ज करताना EWS मध्ये मोडणाऱ्या व्यक्तींना 75,000 रूपये भरावे लागणार आहेत. तर LIG मध्ये मोडणाऱ्या व्यक्तींना दिड लाख रूपये भरावे लागणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास 22 नोव्हेंबरला सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यानंतर अनेकींनी सिडकोने दिलेल्या  https://cidcofcfs.cidcoindia.com या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याच प्रयत्न केला. मात्र त्यात वारंवार एरर येत आहे. अर्ज दाखल होत नाही. त्यामुळे ग्राहकांना पहिल्या दिवशी नाहक त्रास सहन करावा लागला. 22 तारखेला रात्री उशिराही काही जणांना अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही असं काही जण सांगत आहेत. त्यामुळे ही वेबसाईट सुरळीत करावी अशी मागणी सिडको कडे केली जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय

ज्यांना हा अर्ज भरायचा आहे. त्यांना ही कागदपत्र आवश्यक आहेत. त्यात आधारकार्ड, पॅन कार्ड,  DG-locker मध्ये सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे. ,उत्पन्नाचा दाखला 2024-25 या वर्षाच ITR अथवा तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला, बारकोडसह अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहेत. ही कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. जे अर्जदार पात्र ठरतील त्यांना 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. ही घरं रेडी टू मुव्ह आहेत. त्यामुळे घर लागल्यानंतर पैशांचा भरणा लगेच केल्यास घराचा ताबाही लगेच दिला जाणार आहे.