How to Get Rid of Teeth Cavity: दातांना कीड लागणे ही समस्या आता मोठ्यांसह लहान मुलांमध्येही सामान्य झाली आहे. दातांची चमक आणि मजबुती कमी करणारी ही कॅव्हिटीची समस्या वेळीच दूर न केल्यास दात आतून पूर्णपणे पोकळ होऊ शकतात. दातांची कीड (Tooth Worm) आणि पायरियापासून लवकर आराम मिळवण्यासाठी अनेक सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे कोणत्याही 'साइड इफेक्ट'शिवाय दातांचे आरोग्य टिकवता येते. दातांच्या किडीवर रामबाण उपाय सुरुवातीच्या टप्प्यात डॉक्टरांकडे न जाता, काही नैसर्गिक उपायांनी दातांना किड लागण्यापासून वाचवता येते.
खालील 4 सोपे उपाय दातदुखी आणि किडीवर त्वरित आराम देतात.
1. लवंग तेल (Clove Oil): लवंगेत असलेले 'युजेनॉल' (Eugenol) हे नैसर्गिक Antiseptic तत्त्व किडीला कमकुवत करते आणि दातदुखी लगेच थांबवते. एका कापसाच्या बोळ्यावर लवंग तेलाचे 2-3 थेंब टाकून थेट किडलेल्या दातावर ठेवल्यास तात्काळ आराम मिळतो.
2. कडुलिंबाची दातवण (Neem): कडुलिंबात Anti-Bacterial गुणधर्म असतात. सकाळी कडुलिंबाच्या दातवणने दात साफ केल्यास कॅव्हिटी कमी होण्यास मदत होते. कडुलिंबाची पाने आणि मीठ वापरून पेस्ट बनवून ब्रश करणेही प्रभावी आहे.
3. मीठ आणि मोहरीचे तेल: मीठ आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण हिरड्या आणि दातांच्या मुळांना मजबूत करते. या मिश्रणाने दातांवर हळूवारपणे मालिश केल्यास दातांमधील घाण दूर होते आणि किड्यांची वाढ थांबते.
4. तुळस आणि काळी मिरी (Tulsi & Black Pepper): तुळस आणि काळी मिरी एकत्र वाटून तयार केलेली पेस्ट दातांची सूज आणि वेदना कमी करते. ही पेस्ट प्रभावित दातावर 10 मिनिटे ठेवल्यास किटाणूंचा सफाया होतो.दातदुखीची सुरुवात झाल्यास हे नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world