CNG Price Hike: महागाईचा भडका! CNG च्या दरात अचानक मोठी वाढ; रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? जाणून घ्या नवे दर

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर आता ८४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

CNG Price Hike in Mumbai: गेल्या काही दिवसांपासून सोने चांदी, किराणा सामान, दूधाच्या दरात मोठी वाढ झाली असून महागाईचा भडका पाहायला मिळत आहे. अशातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठी झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  महानगर गॅस लिमिटेडने किरकोळ दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केल्यामुळे गुरुवारपासून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (MMR) सीएनजी महाग होणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील सीएनजीचा दर ८२ रुपये प्रति किलोवरून ८४ रुपये प्रति किलो झाला आहे. 

Pune VIDEO: टायमर बॉम्बसदृश्य वस्तूमुळे पुण्यात खळबळ! आरोपीचा हादरवणारा CCTV समोर

सीएनजीच्या दरात मोठी वाढ!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट फटका मुंबईकरांच्या खिशाला बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर आता ८४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

Advertisement

हे नवे दर १४ मे रोजी मध्यरात्रीपासून अंमलात आले आहेत. ​पश्चिम आशियातील इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे गॅस खरेदीचा खर्च वाढल्याचे एमजीएलने स्पष्ट केले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सुमारे १२.८० लाख वाहनचालकांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

रिक्षा, टॅक्सीचे भाडे महागणार? 

यात प्रामुख्याने ४.७० लाख रिक्षा, १.६० लाख टॅक्सी आणि ५ लाखांहून अधिक खासगी गाड्यांचा समावेश आहे. ​या दरवाढीमुळे रिक्षाचालकांचा प्रति किलोमीटरचा खर्च सुमारे १.०३ रुपयांनी वाढणार आहे. परिणामी, येत्या काळात रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीची शक्यता नाकारता येत नाही कारण रिक्षा तसेच टॅक्सीचे भाडे वाढवण्याची मागणी संघटनांनी केली आहे. रिक्षाचे भाडे 1 रुपयांनी तर टॅक्सीचे भाडे 2 रुपयांनी वाढवण्याची मागणी होत आहे. 

Pune News: पुण्यात दहशतवादी कृत्याचा प्रयत्न? हडपसरमध्ये सापडला जिवंत बॉम्ब, पोलिसांकडून परिसराची नाकेबंदी