CNG Supply Cut Off : मुंबई-ठाणेकरांवर मोठं संकट, CNG पुरवठा खंडीत होण्याची शक्यता, पंपांवर भलीमोठी रांग

CNG Supply Cut Off : CNG चे पंप का बंद होणार, कारण काय? परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी किती काळ जाईल? वाचा सविस्तर

जाहिरात
Read Time: 2 mins

CNG Supply Cut Off : मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात CNG पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासून सीएनजी पंपांवर मोठी रांग पाहायला मिळत आहे. अचानक वाढलेली मागणी आणि पुरवठ्याच्या अभावामुळे सीएनजीचा पुरवठा खंडीत होण्याची भीती आहे.  त्यामुळे सीएनजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. 

सीएनजी पुरवठा का झाला खंडीत?

महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, आरसीएफ परिसरात GAIL च्या मुख्य गॅस पाइपलाइनचं नुकसान झालं आहे. पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्यामुळे वडाळा स्थित MGL च्या सिटी गेट स्टेशनपर्यंत गॅसचा पुरवठा खंडीत झाला आहे. ज्यामुळे शहरात सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान पाइपलाइन दुरुस्तीचं काम जलद गतीने सुरू असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

मुंबईतील रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर गाड्यांवर परिणाम

सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे मुंबई शहरांवर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बस, रिक्षा, टॅक्सींवर पडण्याची शक्यता आहे. ओला-उबरवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. शहरांतील मोठा भाग कंप्रस्ड नॅच्युरल गॅसमुळे वाहनांवर अवलंबून आहे. यामध्ये बेस्टच्या काही बसेसचाही समावेश आहे. 

नक्की वाचा - Navi Mumbai Airport :मुंबईहून विमानप्रवास सुखकर; नव्या विमानतळावरुन दिल्ली-बंगळुरूसह या शहरांसाठी मिळेल फ्लाइट

ठाणे-नवीमुंबईतील सीएनजी पंप बंद होण्याची शक्यता...

वडाळाच्या CGS आणि अन्य स्टेशनवरील गॅस पुरवठा थांबल्याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंपांवर झाला आहे. दरम्यान ओला-उबेरच्या किमती अचानक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना याचा फटका सहन करावा लागू शकतो. 

Advertisement

या परिणामादरम्यान MGL ने विश्वास व्यक्त केला आहे की घरोघरी होणाऱ्या PNG वर (घरगुती गॅस) कोणताही परिणाम होणार नाही. घरातील गॅस पाइपलाइन सुरुळीत असेल, असं महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आलं आहे.  दरम्यान CNG पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. पाइपलाइन दुरुस्तीचं काम जलग केलं जात आहे. तरी यासाठी किती काळ लागेल याची माहिती अद्याप कंपनीकडून आलेली नाही. तरी पुढील काही दिवस पंपावर सीएनजी मिळणं कठीण जाऊ शकतं. 


 

Topics mentioned in this article