Pune News : गुडलक कॅफेत अंडाभुर्जीत सापडलं झुरळ; मुंबई- पुणे हायवेवरील फुडप्लाझातील प्रकार

अन्न आणि औषध प्रशासनाने गुडलक कॅफेतील या नव्या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे, जेणेकरून ग्राहकांना चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित अन्न मिळेल याची खात्री करता येईल.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काच सापडल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. आता मुंबई-पुणे हायवेवरील एका फूड प्लाझामधील 'गुडलक कॅफे'मध्ये अंडाभुर्जीमध्ये चक्क झुरळ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे 'गुडलक कॅफे' पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे आणि त्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या गुडलक कॅफेमध्ये ग्राहकाला बन मस्का खाताना त्यात काचेचा तुकडा सापडला होता. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कारवाई करत गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द केला होता.

प्रशासनाने कॅफेला काही त्रुटी सुधारण्यास सांगितले असून, त्याची पूर्तता केल्यानंतरच कॅफे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. यामुळे फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफे सध्या बंद ठेवण्यात आले आहे.

मात्र फर्ग्युसन रस्त्यावरील कॅफे पुन्हा सुरू होण्यापूर्वीच, मुंबई-पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेमध्ये अंडाभुर्जीमध्ये झुरळ आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही नवीन घटना अन्नप्रेमींमध्ये चिंतेचे कारण बनली आहे. या प्रकारामुळे एकाच नावाने चालणाऱ्या या कॅफेतील स्वच्छतेच्या मानकांवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement

अन्न आणि औषध प्रशासनाने या नव्या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे, जेणेकरून ग्राहकांना चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित अन्न मिळेल याची खात्री करता येईल.

Topics mentioned in this article