Pune Weather : पुण्यात हुडहुडी, मुंबईकरांनींही स्वेटर काढले बाहेर; महाराष्ट्रभरात तापमानात मोठी घट

Pune cold wave : पुढील दोन दिवस राज्यभरात अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Cold Wave : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात घट होत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा कमी होताना दिसत आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यभरात अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. (Maharashtra weather)

अचानक थंडी का वाढली? l  Why suddenly get colder?

उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि वातावरणात बाष्पाचा अभाव असल्यामुळे राज्यातील अनेक भागात थंडीची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादाळाचा राज्याच्या हवामानावर मोठा परिणाम झाला. वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. त्यामुळे थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. उद्या १८ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. येत्या २२ नोव्हेंबरपासून तापमानाचा पारा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा - CNG Supply Cut Off : मुंबई-ठाणेकरांवर मोठं संकट, CNG पुरवठा बंद होण्याची शक्यता, पंपांवर भलीमोठी रांग

या जिल्ह्यांना आज १७ नोव्हेंबरला थंडीच्या लाटेचा अलर्ट l Cold wave alert

धुळे, नंदूरबार, जालना, नाशिक, पुणे, पुणे घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. त्यानंतर वाढलेली थंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

पुण्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी पुण्याचं तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. पहाटे तापमान याहून कमी होतं. तर आज दिवसभर पुण्यात थंडीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 

आज महाराष्ट्रातील तापमान कसं आहे? (डिग्री सेल्सिअस)

नाशिक -१०.४
पुणे - १० 
नागपूर - १३
मुंबई - २१
ठाणे - १६
बदलापूर - १५
सातारा - १२
सोलापूर - १५