Pune News : पुण्यात मुसळधार पावसात बेमुदत आमरण उपोषण, आंदोलकांच्या टार्गेटवर पुणे विद्यापीठ, काय घडलंय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 133 प्राध्यापक पदभरती आणि विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतील भरती प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार व गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. यामुळे पुण्यात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Indefinite Hunger Strike In Pune University
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune University latest News Update : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 133 प्राध्यापक पदभरती आणि विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतील भरती प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार व गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. यामुळे पुण्यात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मुसळधार पावसातही आंदोलनकर्त्यांनी उपोषण सुरू ठेवत भरती प्रक्रियेची चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 133 प्राध्यापक पदभरतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार आणि गैरकारभार झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये झालेल्या प्राध्यापक पदभरतीतही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.मुसळधार पावसाची पर्वा न करता आंदोलनकर्ते उपोषणस्थळी ठिय्या देत आंदोलन करत आहेत. प्रशासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Ahilyanagar News : नीट पेपरफुटीचा तणाव जीवावर बेतला, कर्जतच्या विद्यार्थीनीनं आयुष्य संपवलं, ती चिठ्ठी व्हायरल

संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

या आंदोलनात हनुमंते धोंडीबा गणपत आणि डॉ.राहुल ससाणे हे प्रमुख उपोषणकर्ते सहभागी झाले आहेत.त्यांनी भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.प्राध्यापक भरतीतील कथित गैरप्रकारांच्या आरोपांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या आंदोलनाची प्रशासन कशी दखल घेते आणि भरती प्रक्रियेबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.