प्रसाद शिंदे, प्रतिनिधी
Ahilyangar Student Suicide Case : नीट परीक्षेतील कथित पेपर फुटी नंतर अनेक विद्यार्थी मानसिक तणावात असल्याचं पाहायला मिळालं. राज्यात जवळपास 20 ते 22 मुलांनी आत्महत्या केल्याचे देखील समोर आले. पेपरफुटीच्या विरोधात अनेक आंदोलने झाली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना यामुळे राजीनामा देण्याची देखील वेळ आली.अनेक विद्यार्थी मानसिक ताण तणावात राहावं लागलं. अशातच अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंकिता सुरेश सांगळे (19) असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे.
वडील पंढरपूरला गेले अन् मुलीसोबत घडली भयंकर घटना
मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने अंकिता मानसिक तणावात होती,असं कुटुंबाचं म्हणणं आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून यामुळे संपूर्ण कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.अंकिताचे वडील सुरेश सांगळे हे देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असताना ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा >> Shahapur News: धबधब्यावर गेलेली कल्याणची 5 मुलं पुराच्या पाण्यात वाहून गेली, एकाचा मृतदेह सापडला, तर..
खासदार नीलेश लंकेंनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट
मुलीच्या मृत्यूची घटना समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेतील 300 पेक्षा जास्त मार्कची अपेक्षा असताना तिला यावेळेस 166 मार्क मिळाल्याने विद्यार्थिनी मानसिक तणावात होती.खासदार निलेश लंके यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली असून उद्या होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार असल्याचा देखील त्यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world