Create Your Own Personalize UPI ID: डिजिटल पेमेंटच्या जगात क्रांती घडवणाऱ्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आता आणखी एक महत्त्वाचे आणि युझर-फ्रेंडली फीचर जोडले आहे. आता प्रत्येक युझरला त्यांचा मोबाईल नंबर सार्वजनिक न करता, स्वतःची Custom UPI ID तयार करण्याची सुविधा मिळत आहे. यामुळे UPI व्यवहार अधिक सुरक्षित, पर्सनलाईज आणि खासगी (Private) होणार आहेत.
काय आहे नवीन वैशिष्ट्य?
UPI आयडी (ID) सामान्यतः वापरकर्त्याच्या मोबाईल नंबरशी किंवा ईमेल आयडीशी जोडलेली असते. उदाहरणार्थ: 7979XXXX46@hdfcbank. यामुळे ज्या व्यक्तीसोबत आपण आर्थिक व्यवहार करतो, त्या व्यक्तीला तुमचा मोबाईल नंबर मिळतो. दुकाने किंवा आस्थापनांच्या बाबतीत, पेमेंटसाठी सार्वजनिक केलेल्या UPI आयडीमुळे प्रत्येक ग्राहकाला तुमचा नंबर मिळणे, हा गोपनीयतेचा (Privacy) गंभीर मुद्दा बनला होता.
याच समस्येवर उपाय म्हणून, NPCI ने आता Personalize UPI ID तयार करण्याची सुविधा दिली आहे. या नवीन सुविधेमुळे युजर्स आता मोबाईल नंबरऐवजी एक विशिष्ट आणि स्वतःच्या आवडीची टेक्स्ट-आधारित आयडी तयार करू शकतात. उदाहरणार्थ: NIL2309@hdfcbank.
( नक्की वाचा : OLA Uber: ओला-उबरचे भाडे आता सरकारच्या हातात? 'ॲग्रीगेटर नियम 2025' मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती )
UPI पेमेंट आता अधिक सोपे आणि सुरक्षित!
या Custom ID च्या सुविधेसह, NPCI ने नुकतेच पिन (PIN) लक्षात ठेवण्याची गरज संपवणारे आणखी एक वैशिष्ट्य सादर केले आहे. आता युजर्स फिंगरप्रिंट (Fingerprint) किंवा फेस आयडी (Face ID) द्वारे देखील पेमेंट करू शकतात, ज्यामुळे UPI व्यवहार मोबाईल अनलॉक करण्याइतकेच जलद आणि सोयीचे झाले आहेत.
कोणत्या ॲप्सवर सुविधा उपलब्ध?
सध्या हे वैशिष्ट्य Google Pay ॲपवर उपलब्ध होते आणि आता ते PayTM ॲपवर देखील दिसू लागले आहे. लवकरच, इतर प्रमुख UPI ॲप्सवरही ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फीचरमुळे तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी पूर्णपणे लपवता येतो.
( नक्की वाचा : UPI Cash Withdrawal : ATM विसरा! फक्त यूपीआयने मिळेल रोख रक्कम, QR कोडनं काढा पैसे, जाणून घ्या संपूर्ण पद्धत )
तुमचा आवडता UPI ID कसा तयार करणार? (Step-by-Step Process)
तुमची गोपनीयता जपण्यासाठी आणि सोयीसाठी, तुम्ही खालीलप्रमाणे सोप्या 6 स्टेप्समध्ये PayTM ॲपवर तुमची Custom UPI ID तयार करू शकता.
Paytm ॲप उघडा: तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी Paytm ॲप ओपन करा.
प्रोफाईल सेक्शनमध्ये जा: ॲपच्या 'होम स्क्रीन'वरील तुमच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये जा.
सेटिंग्स निवडा: तेथे 'UPI & Payment Settings' या पर्यायावर क्लिक/टच करा.
नवीन ID चा पर्याय: येथे तुम्हाला तुमचे लिंक्ड बँक अकाउंट्स आणि सध्याची UPI ID दिसेल. या पर्यायांच्या खाली 'Create a New UPI ID' वर क्लिक करा.
आयडी तयार करा: आता तुमच्या आवडीनुसार, शब्दांचे (Text) आणि अंकांचे (Numbers) मिश्रण वापरून तुमची युनिक ID तयार करा.
बॅकअप ID (ऐच्छिक): तुम्ही येथे एक बॅकअप म्हणून देखील UPI ID तयार करू शकता. जर तुमच्या नवीन ID वर पेमेंट अयशस्वी (Fail) झाले, तर व्यवहारास (Transaction) कोणताही अडथळा येणार नाही.
या नवीन वैशिष्ट्यामुळे UPI युझर्सचा अनुभव अधिक चांगला होणार असून, डिजिटल व्यवहारात गोपनीयता (Data Privacy) आणि सुरक्षितता (Security) या दोन्ही गोष्टी जपल्या जाणार आहेत.
Custom UPI ID Feature Launched: How to Create Personalized UPI ID Know all process