रशियात बुडून मृत्यू झालेल्या 4 विद्यार्थ्यांपैकी तिघे जळगावातील, 10 दिवसांनंतर आज मृतदेह भारतात दाखल

रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चार भारतीय विद्यार्थ्यांचा वोल्खोव्ह नदीच्या किनारी बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 4 जून रोजी घडली होती.

जाहिरात
Read Time: 1 min
जळगाव :

रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चार भारतीय विद्यार्थ्यांचा वोल्खोव्ह नदीच्या किनारी बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 4 जून रोजी घडली होती. या घटनेतील मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान देशामधील आपत्ती व्यवस्थापनाला या चारही जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर रशियामधील न्यायालयाच्या आदेशाने रशियावरून दुबई मार्गे चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात पाठवण्यात आले असून मुंबई विमानतळावर चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह दाखल झाल्याची माहिती आहे. 

तर मुंबई विमानतळावर शासकीय सोपस्कार पूर्ण करून मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देणार असून यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मधील मृत विद्यार्थी जिया पिंजारी व ईशान पिंजारी व भडगाव मधील हर्षल देसले या तीनही मृत विद्यार्थ्यांवर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बातमी अपडेट होत आहे.