अंतरिम जामीन असूनही आरोपीला पोलिसांची बेदम मारहाण, आरोपीच्या हाताला झालं फ्रॅक्चर

मागील आठवड्यात राबोडी पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या प्रकरणाचा तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता. या पथकाने काही आरोपींना तात्काळ अटक केली.

जाहिरात
Read Time: 1 min

निनाद करमरकर, अंबरनाथ

ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या पोलिसांनी एका गुन्ह्यात अंतरिम जामीन घेऊन चौकशीला गेलेल्या आरोपीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत आरोपीच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. हा तरुण उल्हासनगरचा राहणारा असून त्याच्यावर उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मागील आठवड्यात राबोडी पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या प्रकरणाचा तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता. या पथकाने काही आरोपींना तात्काळ अटक केली, तर या प्रकरणाशी संबंधित प्रेम हरचंदानी या तरुणाने ठाणे सेशन कोर्टातून अंतरिम जामीन मिळवला. 

Xray

यानंतर आपल्या वकिलांसह तो ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकात गेला असता उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने न्यायालयाच्या जामीन आदेशाची प्रत फाडून टाकत वकिलांना तिथून हकलून दिलं आणि प्रेमच्या हातावर, पायावर पट्ट्याने बेदम मारहाण केली, असा प्रेमचा आरोप आहे. 

या मारहाणीत प्रेमच्या हाताच्या पंजाचं हाड फ्रॅक्चर झाल्यानं त्याला आधी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता प्रेमला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर सरकार काय कारवाई करते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article