बेवारस रुग्णाला रात्रीच्या अंधारात निर्जनस्थळी सोडले; ससून रुग्णालयातील संतापजनक प्रकार

वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. त्यानुसार ससूनमधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins

प्रतीक्षा पारखी, पुणे

पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बेवारस रुग्णाला उपचारानंतर रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार ससून रुग्णालयामध्ये घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरचं रुग्णालय प्रशासनाने निलंबन देखील केलं आहे.

रुग्णाला रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडत असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 जुलै रात्री दीड वाजताची ही घटना आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टर आदी कुमार यांनी बेवारस रुग्णांवर उपचार करुन निर्जनस्थळी सोडन दिलं. हा प्रकार वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. त्यानुसार ससूनमधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात. रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. परंतु दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तपास केला त्यावेळी हा गैरप्रकार समोर आला. रुग्णालयातील या गलथान कारभाराचा भांडाफोड करण्यासाठी त्यांनी तपास सुरु केला.

(नक्की वाचा - प्रियकराने महिलेला दोन मुलांसह नदीत फेकले; पुण्यातील मावळमधील मन सुन्न करणारी घटना)

नेमकं काय घडलं?

सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते. ससून रुग्णालयातील डॉ. आदी कुमार यांनी एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली. कुठे सोडायचे अशी विचारल्यावर 'इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे, अशा ठिकाणी सोडायला सांगितले. 'नेमके कुठे सोडू ? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत' असे विचातल्यावर डॉक्टरांनी म्हटलं की तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला 500 रुपये दिले की बरोबर सोडून येतो.

Advertisement

काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार, नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्णाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवले. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले.

(नक्की वाचा-  BJP vs NCP वाद चिघळला! अमोल मिटकरींनी केली भाजपाच्या बड्या मंत्र्यांची तक्रार)

काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली व दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक

घटनेची माहिती मिळताच पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयातील डीन यांची भेट घेतली. संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची त्यांनी मागणी केली. निलंबित करूनच या डॉक्टरची चौकशी करण्यात यावी असाही त्यांनी आग्रह धरला. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मागणीनुसार डॉक्टरचं निलंबन झालं असून प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे. 

Topics mentioned in this article