8 फेब्रुवारीला संत गजानन महाराजांचा प्रगट दिन, पायी दिंडी काढणाऱ्या वारकऱ्यांचा जीव धोक्यात, कारण काय?

शेगावकडे पायी दिंडी करणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारकऱ्यांना मुख्य रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shegaon Dindi Shocking News

अमोल सराफ, प्रतिनिधी

Shegaon Dindi News : विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव 8 फेब्रुवारीला मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.हजारो भाविक या उत्साहात सहभागी होत असतात.आजपासूनच या परिसरातील दिंड्या शेगावसाठी प्रस्थान करत आहेत. परंतु, पायी दिंडी करणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारकऱ्यांना मुख्य रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कारण ज्या ठिकाणी पर्यायी रस्ता होता, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहने मुख्य रस्त्यावरून सुसाट जातात. अशातच दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

रस्त्यावर अतिक्रमण, वारकऱ्यांचा हायवेवरून पायी प्रवास

मिळालेल्या माहितीनुसार, शेगावसाठी पायी दिंडी काढणाऱ्या वारकऱ्यांसाठी 17 किलोमीटरचा मार्ग मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण बांधकामांमुळे दिसेनासा झाला आहे, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. कच्च्या रस्त्यावर काचांचे खच,दगड ,झाडेझुडपे असल्याने वारकऱ्यांना मुख्य रस्त्यावरून पायी जावं लागत आहे. या रस्त्यावरूनच भरधाव वाहने जात असल्याने वारकऱ्यांना प्रवासात तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

नक्की वाचा >> Sangli News : गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांकडून शिंदे गटाच्या गाड्यांची तोडफोड, सभेच्या ठिकाणी काय घडलं? Video

300 वारकरी खामगावहून शेगावकडे रवाना

श्रीक्षेत्र कळमसरा तालुका पाचोरा ते श्री क्षेत्र शेगाव पायी दिंडी सोहळ्याचं हे पाचवं वर्ष आहे.जवळपास 300 वारकरी खामगावहून शेगावकडे पायी निघाले आहेत. राज्यात परिसरातील श्री क्षेत्राला जाण्यासाठी हजारोंच्या संख्येत वारकरी पायी दिंडीने प्रस्थान करतात. परंतु, या वारकऱ्यांसाठी सुरक्षित रस्त्याची सुविधा नसल्याने ते भीतीच्या छायेत प्रवास करत आहेत.वारकऱ्यांसाठी रस्त्यासह योग्य त्या सोयी सुविधांची उपलब्धता करण्यात यावी, अशी मागणीही या वारकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.  

नक्की वाचा >> 'कागदपत्र कसे जळाले नाहीत? 5 जणांचा मृत्यू, सहावा व्यक्ती कुठे?', अजितदादांच्या सर्वात जवळच्या नेत्याला संशय