जाहिरात

'कागदपत्र कसे जळाले नाहीत? 5 जणांचा मृत्यू, सहावा व्यक्ती कुठे?', अजितदादांच्या सर्वात जवळच्या नेत्याला संशय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे खळबळ उडाली आहे.

'कागदपत्र कसे जळाले नाहीत? 5 जणांचा मृत्यू, सहावा व्यक्ती कुठे?', अजितदादांच्या सर्वात जवळच्या नेत्याला संशय
Ajit Pawar Plane Crash Latest Update

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Amol Mitkari On Ajit Pawar Death Incident : अजित पवार यांचा बुधवारी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातात एकूण जणांना जीव गमवावा लागला. या भीषण अपघाताची बातमी समोर येताच राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. अजितदादांचा घातपात झाला की काय?अशा चर्चाही रंगल्या होत्या. पंरतु, शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं. हा घातपात नसून अपघात असल्याचं त्यांनी म्हटलं. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे. काही लोकांच्या सांगण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली,दादांचा मृतदेह ओळखण्यासारखा नसताना कागदपत्रांना साधा जाळ लागला नाही. कागदपत्र कसे जळाले नाहीत? विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं? विमानात सहा लोक बसले होते,मग प्रत्यक्षात पाचच मृतदेह का सापडले? मग सहावा व्यक्ती कुठे आहे?,असे प्रश्न उपस्थित करत मिटकरींनी खळबळ उडवली आहे.

अमोल मिटकरी अजितदादांच्या घटनेबाबत नेमकं काय म्हणाले?

अमोल मिटकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "अजितदादांना जाऊन आज पाच दिवस झाले आहेत. अख्खा महाराष्ट्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आणि आम्ही सर्व पक्षीय नेते अजूनही त्या धक्क्यात आहेत. अजितदादांच्या मृत्यूसंदर्भातील अनेक चर्चा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहारापर्यंत आहे. राजभवनच्या शपथविधीपूर्वी तशा चर्चा काल मी ऐकल्या..देवगिरीवर असताना. नंतर लोकांनी मला विचारलं, काही लोकांच्या सांगण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली,दादांचा मृतदेह ओळखण्यासारखा नसताना कागदपत्रांना साधा जाळ लागला नाही. कागदपत्र कसे जळाले नाहीत? प्रश्न असे आहेत की, विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं? विमानात सहा लोक बसले होते, अशा बातम्या टीव्हीवर चालल्या. मी माहिती घेतली त्यात पाच लोकांची नावं दिसत आहेत. एक कॅप्टन, को -कॅप्टन, माळी नावाची मुलगी, अजितदादा आणि त्यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव,असे पाच लोक होते. पण सहा लोकांची बातमी चालली".

नक्की वाचा >> Budget 2026 : तरुणांना मिळणार रोजगाराच्या मोठ्या संधी, यंदाच्या बजेटमध्ये बेरोजगारांसाठी काय? वाचा सर्व घोषणा

मिटकरी पुढे म्हणाले,"त्या विमानात इंधन असताना शंभर घिरट्याही त्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंगसाठी प्रयत्न केला असता. तरी दादांचा जीव वाचला असता. धावपट्टी दिसत नाही, म्हणून मे डे कॉल देण्यात आला. पुण्यावरून सांगितलं गेलं की, तुम्ही पुण्याला लँड करा. मग त्या पायलटने तिथे लँड का केलं नाही?दोन्ही पायलट कसे बदलले गेले? काही पायलट ट्रफिकमध्ये अडकले होते. मी दादांसोबत दोन-चार वेळा डोमॅस्टिक एअरपोर्टवरून गेट नंबर 8 वरून प्रवास केलाय. दादाही त्याच गेटवरून चालले होते.त्या काळात ट्रॅफिक नसते".

नक्की वाचा >> काल बदलापूरमध्ये तरुणीचा मृत्यू, दुसऱ्याच दिवशी दिवा स्थानकात घडलं..'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

"पण ट्रॅफिकचं कारण दाखवण्यात आलं. ज्या पायलटची दारूची हिस्ट्री आहे,त्याला सस्पेंड केलं. जे विमान नादुरूस्त आहे. मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत माळरानात सापडली. कागद जळलेले नसावेत, याबद्दलाची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे. काही प्रश्न मी उपस्थित केले आहेत. आता सीआयडी चौकशी संदर्भात स्वत: मुख्यमंत्री साहेबांनी तशे निर्देश दिले आहेत. तशी चौकशी सुरु पण आहे. पण याची उच्चस्तरीय चौकशी पण झाली पाहिजे. केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की, हा अपघात आहे की घातपात घडवून आणलाय?मला मनात शंका घ्यायची नाहीय. पण माझ्या मनातील शंकेच निरासरन व्हावं. कारण हूरहूर वाटतेय",असंही मिटकरी म्हणाले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com