Ganesh Visarjan : कल्याणमधील जीवघेणं गणेश विसर्जन, असा द्यावा लागतो बाप्पाला निरोप

जीवघेणं विसर्जन कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Read Time: 1 min
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

देशभरात गणेश विसर्जनाचा (Ganesh Visarjan) उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरातील भक्त आपल्या लाडक्या भक्ताला निरोप देत आहेत. दरम्यान कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ गणेश विसर्जनासाठी आलेल्या भक्तांना आपले जीव धोक्यात घालून विसर्जन करावे लागत आहे.

या ठिकाणी लवकरात लवकर ब्रिज उभारला जावा अशी मागणी अनेक वर्षांपासून भाविक करीत आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. असं जीवघेणं विसर्जन कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. भाविकांना गणेश विसर्जनासाठी रेल्वे ट्रॅक क्रॉस करून कल्याण खाडीकडे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नक्की वाचा - शेगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, 2 तास मिरवणुकीचा खोळंबा

रेल्वे पोलीस बंदोबस्तात भाविक गणेश विसर्जनासाठी ट्रॅक क्रॉस करून ये-जा करीत आहेत. रेल्वे पोलिसांकडून या ठिकाणी रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी पत्र देखील देण्यात आले आहे. आज या ठिकाणी एक महिला ट्रॅक क्रॉस करताना ट्रकमध्ये अडकली होती. पोलिसांनी लगेचच तिला ट्रॅकमधून बाहेर काढून तिचे प्राण वाचवण्यात आले, त्यामुळे अनुचित प्रकार टळला आहे.