जाहिरात

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने नागपुरला जाणं होणार सोपं; रेल्वेकडून आनंदाची बातमी

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने नागपुरला जाणं होणार सोपं; रेल्वेकडून आनंदाची बातमी
नागपूर:

14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त (Dhamma Chakra Parivartan din) नागपूर येथील दीक्षाभूमीवर (Dikshabhumi) राज्यातून रेल्वे मार्गाने जाणाऱ्या लाखो अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनाकडून चांगली बातमी समोर आली आहे. या दिनानिमित्ताने नागपुरात (Nagpur News) जाणाऱ्या अनुयायांची वाढणारी गर्दी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई-पुणे-नागपूर आणि नागपूर-भुसावळ-नाशिक रोड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01017 विशेष 11 ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 2 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01018 विशेष रेल्वेगाडी 13 ऑक्टोबर रोजी नागपूर येथून रात्री 12.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01218 विशेष रेल्वेगाडी 12 ऑक्टोबर रोजी रात्री 10.05 वाजता नागपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.35 वाजता पोहोचेल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वैध आहे का? उच्च न्यायालयाचा थेट सवाल

नक्की वाचा - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वैध आहे का? उच्च न्यायालयाचा थेट सवाल

गाडी क्रमांक 01215 विशेष रेल्वेगाडी 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता नागपूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01216 विशेष रेल्वेगाडी पुणे येथून 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.45 वाजता पोहोचेल.

भुसावळ-नागपूर-नाशिक रोड मेमू विशेष क्रमांक 01213 भुसावळ येथून 12 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.25 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी 12 वाजता पोहोचेल. मेमू विशेष क्रमांक 01214 नागपूर येथून 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11.40 वाजता सुटेल आणि नाशिक रोड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.10 वाजता पोहोचेल. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धम्मचक्र परिवर्तन दिनाचं महत्त्व..
14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तब्बल सहा लाख अनुयायांनी नागपुरातील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या दिवसाला धम्मचक्र परिवर्तन दिन म्हटलं जातं. यानिमित्ताने देशभरातील बौद्ध जनता   नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देते. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com