धारावीत मशिदीचे अतिक्रमण, वाद पेटला, विश्वस्तांचा मोठा निर्णय

मशिदीचे अतिक्रमण वादात सापडले आहे. हे अतिक्रमण हटवण्यावरून धारावीत तणाव निर्माण झाला होता. म

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

धारावीतील 90 फूट रस्त्यावरील मशिदीचे अतिक्रमण वादात सापडले आहे. हे अतिक्रमण हटवण्यावरून धारावीत तणाव निर्माण झाला होता. महापालिकेने हे अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र तरीही हे अतिक्रमण हटवले गेले नाही. त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. राजकारणही झाले. शेवटी मशिदीच्यी विश्वस्तांनी मोठा निर्णय घेत महापालिकेकडे चार ते पाच दिवसांची मुदत मागितली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बृहन्मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या निष्कासन नोटीसनंतर विश्वस्तांनी महापालिकेला एक लेखी विनंती केली आहे. या विनंतीत त्यांनी ही मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी आम्हाला चार ते पाच दिवस द्यावेत अशी विनंती केली आहे.  धारावी येथील 90 फूट रस्त्यावरील अतिक्रमित मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली होती. तसेच या नोटीसीनुसार कारवाई हाती घेतली होती. 

ट्रेंडिंग बातमी - 'उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की...' पाटलांचे थेट आव्हान

कारवाईसाठी पथक गेल्यानंतर त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला असता. मात्र अशा वेळी मशिद विश्वस्तांनी सामंजस्याची भूमीका घेतली. अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ 2 चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली आहे.

ट्रेंडिंग बातमी - 'राजा विरुद्ध जर कुणी प्रखर मत मांडले तर ते सहन केल पाहिजे' गडकरींचा टोमणा कोणाकडे?

विश्वस्तांनीच स्वतःहून बांधकाम हटवण्याची लेखी विनंती केल्याने महानगरपालिका प्रशासनाने ही विनंती मान्य केली आहे. ठरल्या मुदतीत हे अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही विश्वस्तांना देण्यात आले आहेत, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. त्यानंतर धारावीतला तणाव निवळला आहे.