राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी (29 जुलै) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या शाळा बंद?
राष्ट्रपतींच्या दौऱ्यांच्या अनुषंगाने पेरिविंकल इंग्रजी माध्यम शाळा सुस, डॉल्फिन इंग्रजी माध्यम शाळा तापकीर वस्ती, विद्या व्हॅली शाळा सुस, श्रीनिवास पुर्व प्राथमिक शाळा, नानासाहेब ससार इमारत सुस, आदित्य पूर्व प्राथमिक शाळा, पारखे वस्ती सुसगांव, पोद्दार जंबो किड्स सुसगांव, ट्री हाऊस माध्यमिक शाळा, पारखे वस्ती सुसगांव, आर्चिड आंतरराष्ट्रीय शाळा सुस, जिल्हा परिषद शाळा सुसगांव कमान, संस्कारोदय प्राथमिक शाळा, शितळादेवीनगर, लिटील बेरीएस पूर्व प्राथमिक शाळा ठकसेन नगर, किड्झी पूर्व प्राथमिक शाळा सुसगांव, श्री विद्या पूर्व प्राथमिक शाळा व ध्रुव ग्लोबल शाळा सिम्बायोसिस लवळे या शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आल्या आहे.