अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यांना राज्य सरकारने बोनस जाहीर केला आहे. त्यांना दिवाळी निमित्त दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एकूण ₹40.61 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती ही मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती' असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे असं यावेळी आदित तटकरे यांनी सांगितले आहे.
नक्की वाचा - Garba Rada: गरबा खेळताना जोरदार राडा! हाणामारी, दगडफेकीनं रात्र गाजली, 63 जणांवर गुन्हे
भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल असा विश्वासही मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. अंगणवाडी सेविक या खऱ्या अर्थाने फिल्डवर काम करत असतात. त्यांची मेहनतची दखल वेळोवेळी सरकारकडून घेतली गेली आहे. सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होते. त्याच बरोबर आता या अंगणवाडी सेविकांची दिवाळी ही गोड होणार आहे.